Monkeypox Declared Global Health Emergency : जगभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग कायम आहे. जगभरातील देश या महामारीविरुद्ध लढा देत आहेत. अशात आता मंकीपॉक्स विषाणूच्या (Monkeypox) वाढत्या संसर्गाने जगाची चिंता वाढवली आहे. जगभरात मंकीपॉक्स विषाणू संसर्गात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. भारतातही दोन मंकीपॉक्सचे रुग्ण सापडले आहेत. 70 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचा उद्रेक झाला आहे.


मंकीपॉक्स विषाणूच्या संसर्गाबाबतच्या पाच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.


1. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये सापडला पहिला रुग्ण


जगात पहिल्यांदा आफ्रिकन देशात मंकीपॉक्सचा विषाणू आढळून आला. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये नऊ वर्षांच्या मुलामध्ये मंकीपॉक्स विषाणूच्या संसर्गाची पहिली नोंद झाली. त्यानंतर आफ्रिकेतील सुमारे 11 देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणू आढळून आला.


2. मंकीपॉक्स 2003 मध्ये पहिल्यांदा आफ्रिकन देशाबाहेर पोहोचला


2003 मध्ये आफ्रिकेबाहेरील दुसर्‍या देशात मंकीपॉक्स विषाणू संसर्ग पोहोचला. आफ्रिकेबाहेर अमेरिकेत पहिल्यांदा मंकीपॉक्स विषाणू आढळला. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानं (CDC) आतापर्यंत एकूण 87 रुग्णांची नोंद केली आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकाही मंकीपॉक्स संक्रमिताचा मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे.


3. आतापर्यंत 73 देशांमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग


मंकीपॉक्स विषाणूमुळे आतापर्यंत एकूण 73 देशांतील सोळा हजारांहून अधिक लोकांना संक्रमित झाले आहेत. यामध्ये भारताचाही समावेश आहे. सध्या मंकीपॉक्सने ब्रिटन, कॅनडा, स्पेन, पोर्तुगाल आणि अमेरिका यांसारख्या देशांमधील मंकीपॉक्सच्या वाढत्या संसर्गामुळ सर्वाधिक चिंता वाढली आहे.


4. मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित


जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) मंकीपाक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे.  जगातील वाढती रुग्णसंख्या लक्षात जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख (Director-General of WHO) टेड्रोस रिसोर्सेस गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त केली आहे.


5. अमेरिकेच्या CDC ने दिलं मंकीपॉक्स नाव


मंकीपॉक्स संसर्गामुळे स्नायू दुखणे, पाठदुखी, थकवा, डोकेदुखी आणि ताप यासारखी लक्षणं दिसतात. यानंतर, संपूर्ण शरीरात गोवर सारखे पुरळ दिसू लागतात. हा रोग संक्रमित प्राणी किंवा मानवाच्या संपर्कातून पसरतो, हा रोग प्रथम माकडांमध्ये आढळला होता. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानं (CDC) या विषाणूला 'मंकीपॉक्स' असं नाव दिलं.