Indian Woman in Pakistan: फेसबुकवर चॅटिंग नंतर मैत्री आणि त्यानंतर प्रेम इतकं सगळं करून थेट भारताची बॉर्डर पार करून अंजू वर्मा पाकिस्तानात पोहोचली. लग्न केलं आणि नाव ठेवलं फातिमा... आता याच फातिमाला पुन्हा भारतात यायचे आहे. महत्त्वाचं म्हणजे, पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरला (Seema Haidar) मात्र भारत सोडायचे नाही. अर्थात, अंजूला पुन्हा भारतात का यायचंय? पण कशासाठी? तसेच कायदेशीरदृष्ट्या ते किती शक्य आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे तिला तिचे कुटुंबीय स्वीकारणार का? हा खरा प्रश्न आहेत.
अंजू पुन्हा भारतात येणार?
फेसबुक फ्रेन्डच्या प्रेमात वेडी होऊन ने पाकिस्तान गाठलं. तिथे जाऊन मित्राशीच नवा संसार थाटली. जिच्यासाठी पाकिस्तानने रेड कार्पेट टाकलं अशी अंजू वर्मा उर्फ फातिमा आता पुन्हा भारतात येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. जुलैमध्ये आपल्या फेसबुक फ्रेन्डला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या अंजूला आता भारताची आठवण येत आहे. अंजूला तिच्या दोन मुलांची आठवण येत असल्याचा दावा अंजूचा पाकिस्तानातील पती नसरुल्लाहने केला आहे. अंजू मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि ती आपल्या मुलांना खूप मिस करतेय त्यामुळे तिच्या आरोग्याचा विचार केला तर तिने भारतात परत जाणंच योग्य राहिल असं नसरुल्लाहने म्हटलंय.
अंजूला जरी भारतात यायचं असलं तरी तिचा पती आणि मुलं तिला स्विकारणार का? हा खरा प्रश्न आहे.आमच्यासाठी तू केव्हाच मेलीस असं म्हणत तिच्या पतीने तिच्यासोबतचे सर्व संबंध काहीच दिवसांपूर्वी तोडले होते.त्यामुळे भारतात येऊ इच्छिणाऱ्या अंजूसमोर मोठं कोडं आहे. जयपूरला निघाले असं सांगून अंजू 20 जुलै रोजी घरातून निघून गेली. पण तिने जयपूरची नाही तर पाकिस्तानची वाट धरली होती. 22 जुलैपर्यंत ती पतीसोबत व्हॉट्सअॅपवर बोलत राहिली आणि पाकिस्तानात पोहोचताच तिने पतीला खरं काय ते सांगून टाकलं. फेसबुक फ्रेन्डला भेटण्यासाठी पाकिस्तानात आली आहे. पण पुन्हा भारतात परतणार असल्याचा दावा तिने केला.
भारतात परतणार असं म्हणणाऱ्या अंजूची भाषा मात्र 24 तासाच बदलली आणि अंजूने थेट मित्रासोबतच लग्नगाठ बांधली. त्याआधी धर्मांतर केलं प्री वेडिंग फोटोशूट केलं आणि पाकिस्तानची सून झालेल्या अंजूला आहेरांचा वर्षाव होऊ लागला. कुणी फ्लॅट गिफ्ट केला, तर कुणी धनादेश दिला. वाटलं होतं अंजूचा संसार छान सुरु असेल ती तिथे रमली असेल पण तसं झालं नाही. आता तिला पुन्हा भारतात जाण्याचे वेध लागले. दुसरीकडे सीमा हैदर मात्र भारतात खूपच रमली आहे.
भारतात राहण्यासोबतच भारतीय संस्कृती जपण्याचा ती प्रयत्न करतेय पण म्हणून तिची सुरु असलेली चौकशी काही थांबली नाही.या दोन्ही प्रकरणात बऱ्याच गोष्टींचं साम्य असलं तरी एक वेगळेपण नमूद करण्यासारखं आहे. सीमा हैदरला भारतात राहायचंय आणि अंजूला पाकिस्तानातून पुन्हा भारतात यायचंय. पाकिस्तानात तीन महिने राहून आलेल्या अंजूला आता भारताचे दरवाजे उघडे होणार का? आणि तिचं कुटुंबही तिला स्विकारणार का हे पहावं लागेल?
हे ही वाचा :