Flash Floods in Kadapa: तिरुपती आणि आंध्रपदेशमध्ये (Andhra Pradesh) मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे हाहाःकार उडालाय. पावसामुळे पूर आला असून 11 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण बेपत्ता आहे.  पुरात अडकलेल्यांना हेलिकॉप्टरनं सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे. 


आंध्रपदेशच्या अनंतपुर जिल्ह्यातली  चित्रावची नदीच्या पुरात अडकलेल्या दहा जणांना हेलिकॉप्टरमधून रेस्क्यू करण्यात आले आहे.  आंध्रपदेशच्या अनंतपुरम आणि कडप्पा जिल्ह्यातील नद्यांनी पात्र सोडलंय त्यामुळे नदी किनारी असलेल्या गावांना फटका बसला आहे. पुराच्या पाण्यात काही जण वाहून गेल्याचीही शक्यता व्यक्त केली जाते. कडप्पा जिल्ह्यात एक बसही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.


बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण धाल्याने नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे चित्तूर आणि कडप्पा येथे अनेक वर्षानंतर अशी भयानक परिस्थिती निर्माण धाली आहे. मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी पूरग्रस्त जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सूचना दिल्या आहे.


पीटीआय या वृत्तसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अन्नामय्या परियोजनेतील बांध तुटल्यामुळे अचानक पूर आला आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शिवमंदिरात पूजा करण्यासाठी गेलेले भाविक अचानक आलेल्या पूरामुळे अडकले आणि वाहून गेले आहे. बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी बचाव अभियान सुरू केले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD)ने राज्याला पूराचा इशारा दिला असून पुढील 24 तासात आंध्रप्रदेशात पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 


कडप्पा जिल्ह्यात पुरात प्रवाशांसह बस वाहून गेली



इतर महत्त्वाच्या बातम्या :