Railway travelling News : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. कोरोना काळात बंद करण्यात आलेली जेवणाची सुविधा पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. कोविड काळात जेवणाची सुविधा बंद करण्यात आली होती. रेल्वे बोर्डाने शुक्रवारी एका पत्राद्वारे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (IRCTC)ही सेवा पुन्हा सुरू करण्यास सांगितले आहे.
रेल्वे बोर्डाने असेही म्हटले आहे की प्रवाशांना 'रेडी टू इट' जेवण दिले जाणार आहे. सामान्य रेल्वे सेवा पुन्हा सुरू करणे, प्रवाशांच्या गरजा आणि देशभरातील भोजनालये, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि कोविड निर्बंध शिथील झालेल्या ठिकाणी रेल्वेत शिजवण्यात आलेले जेवण देण्याची सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रेल्वे बोर्डाने पत्रात म्हटले आहे. या निर्णयामुळे रेल्वेत पुन्हा पॅन्ट्री कार सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे.
कोरोना महासाथीचा संसर्ग रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने ही सुविधा बंद केली होती. रेल्वेत शिजवलेले जेवण देण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्याशिवाय, प्लॅटफॉर्म तिकिटाचे दरही महाग करण्यात आले होते. प्लॅटफॉर्मचे तिकिट दर वाढवल्यामुळे रेल्वे स्थानकावर अनावश्यक गर्दी कमी होईल असा अधिकाऱ्यांचा अंदाज होता.
रेल्वे तिकिट दरात 15 टक्के कपात?
रेल्वे तिकिट 15 टक्के स्वस्त होऊ शकतात. मागील आठवड्यात भारतीय रेल्वे प्रशासनाने स्पेशल ट्रेन या पुन्हा सामान्य करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. देशात कोरोना महासाथीचा संसर्ग कमी झाल्यानंतर रेल्वेने पुन्हा एकदा लांब पल्ल्याच्या ट्रेन पूर्वीप्रमाणे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
अहंकाराला कोणत्याही लोकशाहीत स्थान नाही; राहुल गांधी यांचे शेतकऱ्यांना पत्र
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha