Travel News: जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा विचार करता, तेव्हा पहिली चर्चा बजेटबद्दल होते. उदाहरणार्थ, अंदमानला भेट देण्याचा विचार झाला की बरेच लोक असं म्हणतात की अंदमानच्या ट्रीपवर इतके पैसे खर्च करण्यापेक्षा तितक्याच पैशात दुबईला जाता येईल. पण, बरेच जण म्हणतात की दुबईला जायचं म्हटलं तर जास्त पैसे मोजावे लागतात. आता नेमकं दुबई आणि अंदमानमध्ये कुठे टूरचा खर्च कमी होईल या संभ्रमात तुम्ही देखील असाल तर या बातमीतून तुमचा संभ्रम दूर होईल.


दुबईला जाण्यासाठी नेमका किती खर्च येतो आणि अंदमान-निकोबारला जाण्यासाठी किती खर्च येतो हे आम्ही सांगणार आहोत. यानंतर तुम्हाला समजेल की अंदमान आणि दुबईपैकी नेमकी कुठली डील तुमच्यासाठी स्वस्त ठरू शकते.


दुबईला जाण्यासाठी नेमका किती खर्च येईल?


दुबई आणि अंदमानच्या टूर पॅकेजच्या किंमतींची तुलना करण्यासाठी आम्ही ऑगस्टचा टाइम स्लॉट घेतला. जेव्हा दोन्ही ठिकाणच्या टूर पॅकेजची माहिती घेतली गेली, तेव्हा दुबईला जाण्याचा खर्च एका व्यक्तीमागे 31,000 रुपये असल्याची माहिती मिळाली. यामध्ये 6 दिवसांचा प्लॅन होता, ज्यामध्ये सर्व प्रायव्हेट ट्रान्सफर, मरीना याचची टूर, इत्यादींचा समावेश आहे. यानंतर, 6 दिवसांनी विमानतळावर परत येईपर्यंतचा खर्च समाविष्ट आहे. तसेच हॉटेलचे भाडे देखील यामध्ये समाविष्ट आहे.


मात्र, तुम्हाला दुबईला जाण्यासाठी वेगळी फ्लाइट घ्यावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला वेगळे 12 ते 15 हजार रुपये मोजावे लागतील. येऊन आणि जाऊन तुमचे 25 ते 30 हजार रुपये विमान खर्चात जाऊ शकतात. त्यामुळे, तुमची दुबईची सहल एकूण 60 हजार रुपयांमध्ये होऊ शकते.


अंदमानला जाण्यासाठी नेमका किती खर्च येईल?


दुबईनंतर आता अंदमानच्या ट्रीपबद्दल बोलूया. ऑगस्ट महिन्याच्या प्लॅनमध्ये अंदमानला जाण्यासाठी 42,000 रुपये खर्च येणार आहे. या प्लॅनमध्ये पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक, नील आयलंड इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे. हा संपूर्ण 6 दिवसांचा प्लॅन आहे. यामध्ये प्रायव्हेट ट्रान्सफर, सेक्युलर जेल, फेरी इत्यादींची फी देखील समाविष्ट आहे. याशिवाय तुम्हाला तिथे स्वखर्चाने विमानाने जावं लागेल. येऊन जाऊन विमान प्रवासात 30 हजार रुपयांपर्यंत खर्च येईल. त्यामुळे, तुमची अंदमानची सहल एकूण 75 हजार रुपयांमध्ये होऊ शकते.


त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या तुलनेत असं गृहीत धरलं जाऊ शकतं की अंदमानला जाणं दुबईला जाण्यापेक्षा जास्त महागडं आहे. परंतु हे सीझन आणि किती दिवस अगोदर तुम्ही सहलीची योजना आखता यावर अवलंबून आहे.


हेही वाचा:


Air Travel: हवामान बदलामुळे वाढतो हवाई प्रवासाचा वेळ, एका अभ्यासात आले समोर