Anant Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटा यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) यांचं प्राण्यावर खूप प्रेम आहे. या प्रेमापोटी त्यांनी एका अभियानाची देखील सुरुवात केली आहे. अनंत अंबानी यांनी प्राण्यांना मदत करण्यासाठी वनतारा प्रोजेक्टची सुरुवात केली आहे. अनंत अंबानी यांच्या 'वनतारा टीम'ने 3500 किमीचा प्रवास करुन जखमी हत्तीचा जीव वाचवला आहे. जखमी हत्तीसाठी अनंत अंबानींची वनतारा टीम देवदूत बनली आहे.


अनंत अंबानी यांच्या वनतारा पथकाने जानमगरहून सुमारे 3500 किमी दूर त्रिपुरामध्ये पोहोचून जखमी गजराज हत्तीवर उपचार करुन त्याचा जीव वाचवला आहे. वनतारा पथकाने 24 तासांच्या आत त्रिपुरा गाठत या हत्तीची मदत केली आहे.  या घटनेच्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये डॉक्टरांचं पथक जखमी हत्ती आणि त्याच्या पिल्लावर उपचार करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ Motivational Quotes नावाच्या एक्स म्हणजे आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. #AnantBhai या हॅशटॅग सोबत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.


जखमी हत्तीसाठी मदतीचं आवाहन


मिळालेल्या माहितीनुसार, एक हत्ती जखमी होता, त्यामुळे त्याची तब्येत खूप बिघडली होती. हत्ती आजारी पडल्यामुळे त्याच्यावर उपचारांसाठी अनंत अंबानींकडे मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं. ईमेलद्वारे मदतीची मागणी केल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आतमध्ये अनंत अंबानी यांची वनतारा टीम त्रिपुरामध्ये हत्तीवर उपचार करण्यासाठी दाखल झाली. वनतारा टीमने एका दिवसात 3500 किमीचा प्रवास करत या हत्तीवर उपचार करून त्याला जीवदान दिलं आहे. 


वनतारा टीम त्रिपुरामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी हत्ती आणि पिल्लाचं व्यवस्थित चेकअप केलं आणि दोघांना आवश्यक औषधौपचार केले. व्हिडीओ शेअर करणाऱ्या यूजरने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, गजराज हत्तीच्या सेवेसाठी वनतारा टीम पोहोचली आहे. 24 तासांतच वनतारा टीम येथे पोहोचली असून त्यांनी हत्तीवर उपचार केले. यासाठी त्यांनी अनंत अंबानी यांच्यावर वनतारा टीम आणि डॉक्टरांचेही आभार मानले आहेत.


काय आहे प्रोजेक्ट वनतारा?


अनंत अंबानी यांनी हत्तींच्या संवर्धनासाठी वनतारा नावाची योजना सुरु केली आहे. गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या रिलायन्स कॉम्प्लेक्सजवळ वनतारा प्रोजेक्ट सुमारे 600 एकरमध्ये पसरलेला आहे. आजारी हत्तींची येथे काळजी घेतली जाते. त्यासाठी येथे जागतिक दर्जाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. अलिकडेच वनतारा प्रोजेक्टचे काही फोटोही समोर आले होते.