Hindustan Aeronautics Limited Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आली आहे. Hindustan Aeronautics LTD मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. भरपूर जागा निघाल्या आहेत. त्यामुळं ज्यांना नोकरीची गरज आहे, अशा गरजूंनी यासाठी अर्ज करावा. यासाठी नेमकी पात्रता काय? अर्ज करण्याची अंतिम तारीख काय? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 


पदवीधर अप्रेंटिस


पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी जागा निघाल्या आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता ही  संबंधित विषयात पदवी आवश्यक आहे. या पदासाठी एकूण जागा या 89 निघाल्या आहेत. या जागांसाठी मुलाखत ही 20 ते 24 मे 2024 या काळात सुरु होणार आहे. त्यामुळं 20 तारखेच्या आधी तुम्ही याबाबतची सर्व तयारी करणं गरजेचं आहे. अधिकृत वेबसाईट - HAL-india.co.in या साईटवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.


डिप्लोमा अप्रेंटिस


डिप्लोमा अप्रेंटिस या पदासाठी देखील भरती सुरु झाली आहे. यासाठी एकूण 35 जागा निघाल्या आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयात डिप्लोमा
आवश्यक आहे. यासाठी एकूण 35 जागा निघाल्या आहेत. या पगासाठी मुलाखत ही 20 ते 24 मे 2024 या काळात आयोजीत करण्यात आल्या आहेत. 
अधिकृत वेबसाईट - hal-india.co.in यावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 


ITI अप्रेंटिस


ITI अप्रेंटिस या पदासाठी देखील भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी एकूण जागा 200 निघाल्या आहेत. शैक्षणिक पात्रता ही संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण गरजेचा आहे. एकूण जागा या 200 आहेत. या पदासाठी मुलाखत ही 20 ते 24 मे 2024 या काळात होणार आहे. 


मुलाखतीचे ठिकाण कुठे?


या सर्व पदासांठीच्या मुलाखतीचे ठिकाण हे  Hindustan Aeronautics Limited, Avionics Division, Balanagar, Hyderabad- 500042 या ठिकाणी असणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती  hal-india.co.in या  वेबसाईटवर देण्यात आली आहे. 


या पदांसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परिक्षा होणार नाही.


दरम्यान, जे उमेदवार Hindustan Aeronautics LTD मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. वर दाखवल्याप्रमाणे विविध पदांसाठी फक्त मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. या पदांसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परिक्षा होणार नाही. त्यामुळं पात्र, उमेदवारांना Hindustan Aeronautics LTD मध्ये नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. त्यामुळं शैक्षणिक पात्रता असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या तारखेप्रमाणं वेळेत मुलाखतीसाठी हजर राहावे. 


महत्वाच्या बातम्या:


IB Recruitment 2024 : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती; अर्ज कसा करायचा? पगार किती मिळणार? वाचा सविस्तर...