मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनदरम्यान तणावाचं वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारनं हॅलो आणि टिकटॉकसह काही चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. पब्जी गेम तरुणाईमध्ये कमालीचा लोकप्रिय आहे, हाच धागा पकडत अमूलने पब्जी गेमबाबत एक भन्नाट ट्विट केलं असून त्याद्वारेही तरुणाईमध्ये जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला आहे.
या निर्णयानंतर अनेक मिम्स, विनोद व्हायरल झाले. मात्र या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतलं ते अमूलच्या डूडलने. आपल्या हटके डूडलसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अमूलने पब्जी बॅनवर एक डूडल प्रसिद्ध केलं असून ते लोकांना प्रचंड आवडले आहे.
अमूलच्या या डूडलमध्ये तीन मुलांना दाखवले आहे. यामध्ये एक मुलगी पब्जी खेळणाऱ्यांना रागवताना दिसते. ती म्हणते, “सब्जी? हा जी. पब्जी? ना जी! (भाज्या? होय. पब्जी? नाही!)”
नेटकऱ्यांच्याही अमूलचं हे डूडल चांगलंच पसंतीस पडलंय. तर, काही जणांनी मात्र त्या ट्विटवर रिप्लाय देताना गेम बॅन झाल्याबद्दल दुःख व्यक्त केलंय. “परफेक्ट जी ”,असे म्हणत अमूलचे कौतुक केले. . तर, ‘मनापासून खूप वाईट वाटतंय….’ अशा आशयाचे मिम्स काही नेटकऱ्यांनी व्हायरल केले आहेत.
संबंधित बातम्या :