नवी दिल्ली : मोदी सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गेल्या तीन वर्षांतील भाजप सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडला.


गेल्या तीन वर्षात देशातील लोकांचा आत्मविश्वास वाढला असून मोदी सरकारने नव्या भारताचा पाया रचल्याचं अमित शाहांनी सांगितलं. विरोधकांवर होणारी कारवाई केवळ आकसापोटी नसून त्यांनी भ्रष्टाचार केला नसेल तर समोर येऊन बोलावं, असं आव्हानही त्यांनी दिलं.

दरम्यान केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लेखाजोखा अमित शाहांनी यावेळी मांडला. नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राईक यांसारख्या धाडसी निर्णयांचा उल्लेखही त्यांनी केला.

अमित शाहांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  • नोटाबंदीसारखा धाडसी निर्णय घेतला, ज्यामुळे काळा पैसा रोखण्यास मदत झाली

  • सर्जिकल स्ट्राईकमुळे जगभरात कठोर संदेश गेला

  • निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी 20 हजार रुपयांपर्यंतच्या देणगीची मर्यादा केवळ दोन हजार रुपये केली

  • मोदींनी देशभरातील सर्व निवडणुका एकाच दिवशी घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे

  • सर्व पक्षांना सोबत घेऊन सरकारने जीएसटी विधेयक मंजूर केलं

  • अपंगांना दिव्यांग नाव देण्यासाठी कायदा आणला. सरकारने दिव्यांगांना सन्मान देण्याचं काम केलं.

  • मातृत्व रजा 26 आठवडे केली

  • मोदी सरकारने योग दिनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगभरात पोहचवण्याचा निर्णय घेतला.

  • तेजस विमान वायुदलाच्या ताफ्यात सहभागी झाल्याने वायूदलाची शक्ती वाढवण्याचं काम सरकारने केलं.

  • लाल दिवा हटवून देशातील व्हीआयपी संस्कृती संपवली

  • सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्ग 2016-17 या वर्षात बांधण्यात आले

  • साडे चार कोटी घरांमध्ये शौचालय बांधण्यात आले