पुदुच्चेरी: शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुद्दुचेरीचा दौरा आखला आहे. त्यांच्या या दौऱ्याआधीच काँग्रेसला झटका बसला आहे. काँग्रेसच्या चार आमदारांनी पक्षाला रामराम केल्याने पद्दुचेरीतील नारायणस्वामी सरकार अल्पमतात आले आहे.


पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांची नायब राज्यपाल पदावरुन अचानक उचलबांगडी करण्यात आली आहे. तेलंगणाचे राज्यपाल तिमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे पद्दुचेरीचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर 33 सदस्य असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत आता काँग्रेसकडे केवळ 14 आमदार राहिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी आपले बहुमत गमावलं आहे.


या पार्श्नभूमीवर राहुल गांधी यांचा पुद्दुचेरीचा दौरा आहे. त्यामुळे आता अल्पमतात आलेलं काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी राहुल गांधी कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.


बहुमत गमावल्याने मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे तर आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी केला आहे. येत्या काही महिन्यात पुद्दुचेरीच्या विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे.


Puducherry: पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरुन किरण बेदींची उचलबांगडी, काँग्रेस सरकार अल्पमतात


पुद्दुचेरीत घडत असलेल्या या घडामोडीमुळे राजकीय संकट गडद झालं आहे. पुद्दुचेरीच्या या घटनांकडे केंद्र सरकार बारीक लक्ष ठेऊन असून, किरण बेदींची उचलबांगडी ही त्याचाच एक भाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


33 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसकडे आता दहा तर सहयोगी तीन सदस्य आणि एक अपक्ष असे 14 सदस्य आहेत. तर विरोधी पक्ष भाजपकडेही आता 14 सदस्य आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आणि काँग्रेस हायकमांड आता कोणती खेळी खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


पुद्दुचेरीतील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पावले टाकायला सुरुवात केली असून किरण बेदींची नायब राज्यपाल पदावरुन उचलबांगडी करणे हा त्याचाच भाग असल्याचं सांगण्यात येतंय. किरण बेदींच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री नारायणस्वामी यांच्या सरकारला लोकांची सहानुभूती मिळत असल्याची तक्रार काही भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याची माहिती होती.


North India Earthquake | मला वाटतंय भूकंप सुरु आहे; राहुल गांधींनी अनुभवला भूकंप