Amarnath Yatra Cloudburst : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी होऊन पूर आल्याने 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरुच असून रडार यंत्रणेद्वारे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती देत सांगितलं की, लष्कराकडून 4000 रहार लावण्यात आले आहेत. यामुळे ढिगाऱ्याखाली अडकललेल्या लोकांचा शोध घेण्यात मदत होणार आहे. दरम्यान ढगफुटीमुळे स्थगित करण्यात आलेली यात्रा सोमवारपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. 


उपराज्यपालकडून बेस कँम्पची पाहणी करत यात्रेकरुंसोबत संवाद


सोमवारी सकाळीच जम्मू येथील बेस कँम्पमधून यात्रेकरु अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. याआधी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बेस कँम्पची पाहणी करत यात्रेकरुंसोबत संवाद साधला. यावेळी त्यावेळी यात्रेकरुंना योग्य सुविधा पुरवण्यात येतील असं आश्वासन दिलं आहे.


स्थगित अमरनाथ यात्रेला पुन्हा सुरुवात
अमरनाथ गुहेजवळ (Amarnath Cloudburst) ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. आता यात्रा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. जम्मूमधील बेस कँम्पमधून (Base Camp) यात्रेकरुंचा पहिला गट अमरनाथच्या गुहेकडे जाण्यासाठी रवाना झाला आहे. यात्रा पुन्हा सुरु झाल्याने यात्रेकरुंमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.


दोन वर्षानंतर होतेय अमरनाथ यात्रा
अमरनाथ यात्रा दोन वर्षानंतर होत आहे. कोरोनामुळे दोन वर्ष अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. आता स्थगित यात्रा पुन्हा सुरु झाल्याने यात्रेकरुंमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यात्रेकरुंनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, 'आम्ही बाबा बर्फानी यांचा आर्शिवाद घेण्याचं ठरवून आलो आहे. त्यामुळे भगवान शंकराचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही घरी परतणार नाही. यात्रेवेळी अचानक दुर्घटना घडली. मात्र यात्रा पुन्हा सुरु झाल्याने आम्ही आनंदी आहोत.'


महत्त्वाच्या इतर बातम्या