Mohammed Zubair Arrested : ऑल्ट न्यूजचे (Alt News) सहसंस्थापक मोहम्मद झुबेर (Mohammed Zubair) यांना न्यायालयाने धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी (Hurting Religious Sentiments) एक दिवसाची पोलीस कोठडी (Police Remand) सुनावली आहे. मोहम्मद झुबेर यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयपीसी कलम 153/295 अंतर्गत अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे की, मोहम्मद झुबेर यांना कायदेशीर मदत मिळण्यासाठीही काहीसा दिलासा मिळाला आहे. झुबेर यांना कायदेशीर बाबींसाठी दिवसातून एकदा अर्धा तास वकिलाला पोलीस कोठडीत भेटण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
दिल्ली पोलीस काय म्हणाले?
दिल्ली पोलिसांकडून असं सांगण्यात आलं की, मोहम्मद झुबेर यांनी एका विशिष्ट धार्मिक समुदायाविरुद्ध पोस्ट केलेले फोटो आणि शब्द हे अत्यंत प्रक्षोभक असून लोकांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी हेतूपुरस्सर आहेत. यामुळे सार्वजनिक शांतता राखणं कठीण होऊ शकते. या पोस्टच्या आधारे वरील गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी झुबेर यांना पुरेशा पुराव्याच्या आधारे अटक करण्यात आल्याचा दावा केला आणि त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागितली.
याबाबत बोलताना Alt News सह-संस्थापक प्रतीक सिन्हा यांनी सांगितले की, मोहम्मद झुबेर यांना 2020 मध्ये एका वेगळ्या प्रकरणात चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बोलावले होते. या प्रकरणात त्यांना उच्च न्यायालयाचे संरक्षण मिळाले आहे. तथापि, आज संध्याकाळी 6:45 वाजता आम्हाला कळवण्यात आले की, त्यांना आता अन्य एका प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यामुळे अटक करण्यात आली आहे.
ते म्हणाले की, मोहम्मद झुबेर यांना या प्रकरणी कोणतीही सूचना देण्यात आली नाही. ज्या कलमांमध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे, त्या कलमांमध्ये नोटीस देण्याची तरतूद आहे. मात्र तसे करण्यात आलेले नाही. अनेक वेळा विनंती करूनही आम्हाला एफआयआरची प्रत देण्यात आली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Mohammed Zubair Arrested: पत्रकार मोहम्मद झुबेर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
- पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची 56 लाखांची फसवणूक, चार जणांना ठोकल्या बेड्या
- Mumbai Building Collapse : मुंबईतील कुर्ला परिसरात दुर्घटना; चार मजली इमारत कोसळली, 20-25 जण ढिगाऱ्याखाली अडकले