झाशी :  झाशीतील सुखनई नदीजवळील लुहरगाव येथे  पाईपलाईनचे खोदकाम करताना जुनी नाणी सापडली आहे.  सोन्या - चांदीची नाणी असल्याचा दावा उपस्थित नागरिकांनी केली आहे. ही नाणी कंत्राटदाराने त्वरित पोलिसांकडे सुपुर्द केली. ही नाणी लवकरच तपासणीसाठी राज्य पुरातत्व विभागाकडे सुपुर्द केली जाणार आहेत. नाण्यांचा खजाना सापडल्यानंतर प्रशासनाने पोलिसांच्या देखरेखीखाली खोदकाम आणखी पाच दिवस करण्याचे आदेश दिले आहे.


मऊरानीपूरच्या लुहरगावात सुखनाई नदीच्या पाईपलाईनचे खोदकाम जेसीबीच्या साहाय्याने सुरू होते. जेसीबीने खड्डे खोदून त्यातील माती बाहेर काढत असताना सोमवारी सायंकाळी अचानक नाण्यांचा खळखळाट झाला. आवाज येताच जेसीबी थांबवून पाहणी केली असता एका गाठोड्यामध्ये नाणी सापडली. काही नाणी खड्डयातही आढळली. नाणी सापडताच कंत्राटदार या ठिकाणी पोहचला. गावकरी जयप्रकाश याचा आरोप आहे की, कंत्राटदाराने सगळा खजाना आपल्याकडे घेतल्याची माहिती समोर येत आहे. 


एसडीएम मऊरानीपूरचे मृत्युंजय शर्मा म्हणाले, ही नाणी 1901 ते 1916  या काळातील असल्याचा अंदाज आहे. ही नाणी कोणत्या धातूची आहे याचा शोध घेतला जात आहे. हर घर नल योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. 12 नाणी मिळाली असून ती पोलिसांना देण्यात आली आहे. त्यानंतर पोलीसांच्या देखरेखीखाली पाच दिवस खोदकाम सुरू ठेवण्यात येणार आहे.  त्या ठिकाणी आणखी खजाना असल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केले आहे.  तसेच सापडलेला खजाना कंत्राटदार घेऊन पळाल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी केला आहे.  सापडलेली नाणी ब्रिटिशकालीन असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.


सापडलेली नाणी ब्रिटीशकालीन असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. ब्रिटीशकालीन नाणी सापडल्यामुळे पाईपलाईनचे काम  त्वरित थांबविण्यात आले. पोलिसांच्या बंदोबस्त खोदकाम सुरू आहे.  तसेच राज्य पुरातत्त्व विभागाकडून मार्गदर्शन घेतले जाणार आहे.


संबंधित बातम्या :


झाशी रेल्वेस्थानक आता वीरांगणा लक्ष्मीबाई नावाने ओळखले जाणार, योगी सरकारचा नामांतरणाचा निर्णय


Raigad : शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या स्वाभिमानाचं प्रतीक असलेलं 'शिवराई होन' म्हणजे नेमकं काय?