नवी दिल्ली : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या दोन वर्ष जुन्या सभासदांच्या पदवीची पडताळणी केल्यास भारतातील 45 टक्के वकील बोगस निघतील. बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या एका अहवालातून हे समोर आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.


गेल्या आठवड्यात बार काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी भारताचे मुख्य न्यायमूर्ती जे. एस. खेहर आणि अन्य एका न्यायधीशांसमोर माहिती सादर केली. त्यानुसार वकिलांच्या पदवीसंदर्भात सुरु असलेल्या पडताळणीमध्ये देशात 55-60 टक्केच वकील खरे आहेत. तर उर्वरीत म्हणजे 45 टक्के वकील बोगस असल्याचं समोर येतं आहे.

दरम्यान, तरुण वकिलांना या क्षेत्राबद्दल अधिक चांगल्या प्रकारे माहिती मिळावी म्हणून प्रशिक्षण द्या. वकिली क्षेत्रातील तत्त्व समजावून सांगा, असे न्यायमूर्ती जे. एस. खेह यांनी बार काऊन्सिल ऑफ इंडियाला सल्ला दिला.