Allahabad High Court said Liking Obscene Post Not Offence : फेसबुक (Facebook) किंवा ट्विटर एक्स (Twitter X) वर यासारख्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर अश्लील पोस्ट (Obscene Post) शेअर करणं गुन्हा आहे, पोस्ट लाईक (Post Like) करणे हा गुन्हा नाही, असं अलाहाबाद उच्च न्यायालय (Allahabad High Court) ने म्हटलं आहे. पोस्ट लाईक करणं हे पोस्ट प्रकाशित किंवा प्रसारित करण्यासारखे नाही, त्यामुळे आयटी कायद्याअंतर्गत हे कृत्य दंडनीय नाही, असं अलाहाबाद हायकोर्टाने म्हटलं आहे. 


पोस्ट करणं गुन्हा, लाईक करणं नाही


एका प्रकरणाची सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, फेसबुक किंवा एक्सवर अश्लील पोस्ट शेअर करणं गुन्हा आहे. न्यायमूर्ती अरुण कुमार सिंह देशवाल यांच्या एकल  खंडपीठाने एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हा निर्वाळा दिला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत शिक्षा फक्त पोस्ट लाइक करणे हा पोस्ट प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे, यासारखा गुन्हा नाही, त्यामुळे या प्रकरणी शिक्षा होऊ शकत नाही.


नेमकं प्रकरण काय?


या प्रकरणात याचिकाकर्त्याच्या विरोधात आरोप होता की, त्याने सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह आणि उत्तेजक संदेश पोस्ट केले होते. ज्यामुळे  मुस्लिम समाजातील सुमारे 600-700 लोकांनी परवानगीशिवाय मिरवणुकीची व्यवस्था केली, ज्यामुळे शांतता आणि सुरक्षेचा गंभीर धोका निर्माण झाला. सुनावणीदरम्यान, या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांनी काझमीने जमाव जमवण्याचे आवाहन करणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्ट लाइक केल्याच्या वस्तुस्थितीवर विश्वास ठेवला. पण काझमीने स्वत: पोस्ट केल्याचा किंवा पोस्ट शेअर केल्याचा पुरावा पोलिसांना सादर करता आला नाही.


अश्लील पोस्ट लाइक करणं गुन्हा नाही


या प्रकरणी सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालय (Allahabad High Court) ने म्हटलं की, अश्लील साहित्य प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे हा गुन्हा आहे. एखादी पोस्ट किंवा संदेश जेव्हा पोस्ट केला जातो, तेव्हा प्रकाशित केला जातो असे म्हटले जाऊ शकते आणि पोस्ट किंवा संदेश शेअर किंवा रीट्विट केल्यावर प्रसारित केला जाऊ शकतो. खंडपीठाने पुढे सांगितले की, याचिकाकर्ता फरहान उस्मानची पोस्ट लाईक केली आहे, पण पोस्ट लाइक करणे हे पोस्ट प्रकाशित किंवा प्रसारित करण्यासारखा गुन्हा नाही, म्हणून आयटी कलम 67 लागू होणार नाही. कोणत्याही पोस्टला फक्त लाईक करणं अपराध नाही.