Akhilesh Yadav : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी आता नवी खेळी केली आहे. यादवांनी काँग्रेस पक्षाला (Congress Party) 17 जागांची ऑफर दिली आहे. समाजवादी पक्षाकडून काँग्रेस पक्षाला ही शेवटची ऑफर देण्यात आली आहे. काँग्रेसने मुरादाबाद आणि बलिया या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित आहे. त्यावर अजूनही चर्चा सुरु आहे. मुरादाबादच्या जागेवर समाजवादी पक्षाने विजय मिळवला होता. त्यामुळे बलियाच्या जागेवर समाजवादी पक्ष मजबूत असल्याचे बोलले जात आहे. बलियाची जागा काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष अजय रॉय यांच्यसाठी मागत आहे. 


अखिलेश यादवांचा काँग्रेसला अल्टीमेटम 


जर काँग्रेस पक्षाने आज रात्रीपर्यंत 17 जागांच्या ऑफरवर सहमती दर्शवली नाही तर भारत जोडो न्याय यात्रेत सामील होणार नाहीत, असा अल्टिमेटम अखिलेश यादव यांनी दिला आहे. सर्व जागांवर एकमत झाल्यानंतरच काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होईल, असे अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले आहे. 






समाजवादी पक्षाकडून 11 उमेदवारांची घोषणा 


समाजवादी पार्टीकडून सोमवारी (दि.19) 11 उमेदवारांची घोषणा केली. अखिलेश यादवांनी मुजफ्फरनगर आणि गाजीपूर सारख्या महत्वपूर्ण जागांचे उमेदवार जाहिर केले आहेत. मुजफ्फरनगरमधून हरेंद्र मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाय गाजीपूरमधून मुख्तार अंसारी यांचे भाऊ अफजाल अंसारी यांना उमेदवारी देण्यात आलीये. सपाने शाहजहापूरमधून राजेश कश्यप, हरदोईमधून उषा वर्मा, मिश्रिख लोकसभा मतदारसंघातून रामपाल राजवंशी, मोहनलालगंज मतदारसंघातून आरके चौधरी आणि प्रतापगढमधून एसपी सिंग बघेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय.






उत्तर प्रदेशच्या 80 जागांपैकी 27 जागांवरील उमेदवार घोषित 


समाजवादी पक्षाने यापूर्वी 30 जानेवारीला उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीतून सपाने 16 उमेदवारांची नावे घोषित केली होती. पहिल्या यादीनुसार, डिंपल यादव मैनपुरीतून तर शफीकूर रहेमान संभल मतदारसंघातून  आणि रवींद्र मल्होत्रा लखनौ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उत्तर प्रदेशच्या 80 जागांपैकी 27 जागांवरील उमेदवार अखिलेश यादव यांनी जाहिर केले आहेत. 




इतर महत्वाच्या बातम्या 


Asaduddin Owaisi : पीएम मोदी, उद्धव ठाकरे जो कुर्ता घालतात,तो बाबराने भारतात आणला होता;असदुद्दीन ओवैसी यांचा दावा