Akasa Air : राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीचे अकासा एअर कंपनीचे (Akasa Air) पहिलं विमान उडणार आहे. पहिले विमान हे 7 ऑगस्ट 2022 पासून मुंबई ते अहमदाबादला (Mumbai To Ahmedabad) उड्डाण करणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, कोची या चार शहरांना जोडले जाणार आहे. Akasa एअर फ्लाइट्सची तिकिटांची बुकिंग 22 जुलै 2022 पासून म्हणजेच आजपासून सुरू झाली आहे. इतर फ्लाईट्सच्या तुलनेत अकासाकडून 5 ते 7 टक्के स्वस्तात तिकीटांची बुकिंग अकासाच्या सर्व फ्लाईट्सच्या तिकीटांच्या विक्रीसाठी बुकिंग उपलब्ध करण्यात आली आहे.


मुंबई अहमदाबाद दरम्यान 28 साप्ताहिक उड्डाणे (Weekly flights)
अकासा एअरचे पहिले विमान 7 ऑगस्ट रोजी मुंबई ते अहमदाबादसाठी उड्डाण करणार आहे. याच्या सुरुवातीला, मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान दर आठवड्याला 28 साप्ताहिक उड्डाणे करतील. 13 ऑगस्ट 2022 पासून, बेंगळुरू आणि कोची दरम्यान 28 साप्ताहिक उड्डाणे होतील. अकासा एअर फ्लाइटच्या बुकिंगबद्दल, सीईओ विनय दुबे म्हणाले की, फ्लाइटच्या तिकिटांची विक्री सुरू करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांनी म्हटले की, Akasa कडून एक कार्यक्षम ग्राहक सेवा, विश्वासार्ह नेटवर्क, अत्यंत परवडणारे भाडे, तसेच ग्राहकांना आवडेल असा इमर्सिव्ह फ्लाइंग अनुभव देण्यासाठी उत्सुक आहेत.


इतर शहरांसाठी देखील लवकरच सेवा सुरू होईल
अकासा एअरचे सह-संस्थापक आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी प्रवीण अय्यर म्हणाले की, अकासा एअर देशभरात अस्तित्वात असेल आणि मेट्रोला टियर 2 आणि टियर 3 शहरांशी जोडण्यासाठी काम करेल. ते म्हणाले की, दर महिन्याला दोन नवीन विमाने ताफ्यात समाविष्ट केली जातील, त्यानंतर टप्प्याटप्प्याने नेटवर्कचा विस्तार करताना आणखी शहरे जोडली जातील.


संबंधित बातम्या


भारत ते व्हिएतनाम प्रवास फक्त 26 रुपयात, 'या' एअरलाइन्सची भन्नाट ऑफर


विमानाला लेझर लाईट दाखवल्यास होऊ शकते अटक, जाणून घ्या काय आहेत नियम


स्पाइसजेटच्या विमानाने उड्डाण करताच इंजिनला लागली आग, 185 प्रवासी थोडक्यात बचावले