Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. मागील 24 तासांत 21 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 60 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 21 हजार 880 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. लवकरच सक्रिय रुग्णांची संख्या दीड लाखांचा आकडा पार करेल. सध्या देशात एक लाख लाख 49 हजार 482 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या पाहता आरोग्य प्रशासनासमोर मोठी चिंतेची बाब निर्माण झाली आहे.


देशात 24 तासांत 60 कोरोना रुग्णांचा मृत्यू


देशात वाढत्या कोरोना रुग्णांसह कोरोनाबळींच्या संख्येतही वाढ झाली आहे. भारतात गुरुवारी दिवसभरात 60 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची वाढती संख्याही चिंतेची बाब आहे. देशात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले 1 लाख लाख 49 हजार 482 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मागील 24 तासांत 21 हजार 219 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात एकूण 4 कोटी 31 लाख 71 हजार 653 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. देशात एकूण 5 लाख 25 हजार 930 रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे प्राण गमावला आहे.






महाराष्ट्रात गुरूवारी 2289 कोरोना रूग्णांची नोंद
गुरुवारी महाराष्ट्रात 2289 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या 24 तासांत एकूण 2400 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे. गुरुवारी सहा कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,64,831 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.97 टक्के इतकं झालं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या