Emergency Landing of Plane: बिहारमधील (Bihar) पाटणाहून (Patna) दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेट विमानाच्या इंजिनला रविवारी उड्डाण करताच लगेचच आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच विमानाची पाटणा विमानतळावर सुरक्षित लँडिंग (Emergency Landing) करण्यात आली. सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून आग विझवण्यात आली. उड्डाणानंतर लगेचच कमी उंचीवर पक्ष्याच्या धडकेने विमानाला आग लागली. स्पाइसजेटने या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी केले असून विमानाच्या पंख्यात पक्षी अडकल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे आरे विमानतळ प्रशासनाकडून अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.
डीजीसीएनेही प्राथमिक तपासात विमानाच्या पंख्यात पक्षी अडकल्याने इंजिनला आग लागल्याची शक्यता व्यक्त केली होती. पाटणा विमानतळ (Patna Airport) प्रशासनाने तांत्रिक चौकशीचे आदेश दिले आहेत. विमानात एकूण 185 प्रवासी होते, कोणालाही दुखापत झाली नाही. पाटणाच्या एसएएसपीने मीडियाला सांगितले की, विमानाने उड्डाण करताच त्याच्या एका इंजिनमधून धूर निघताना दिसला. यानंतर विमानाची विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आली. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
दरम्यान, स्पाइसजेटच्या (Spicejet) विमानाने (उड्डाण क्रमांक- SG 725) उड्डाण करताच त्याच्या डाव्या इंजिनमधून आगीचे गोळे निघू लागले. विमानातून झालेल्या जोरदार स्फोटांनी आतील प्रवासी घाबरले. तसेच हे आवाज ऐकून शहरातील लोकही हैराण झाले. या विमानाने पाटणा विमानतळावरून दुपारी 12.10 वाजता उड्डाण केले. थोडे अंतर गेल्यावरही परिस्थिती नियंत्रणात आली नाही, त्यामुळे वैमानिकाने तातडीने एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे विमान मागे घेण्याची परवानगी मागितली. यानंतर धावपट्टी मोकळी करून विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Agnipath Scheme: प्रत्येक युवकाला भरतीआधी हिंसाचारात सहभागी नसल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागणार, सेना दलाची घोषणा
Lalitpur : रेल्वेरूळ ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेसाठी आरपीएफ जवान बनला देवदूत; व्हिडीओ व्हायरल
Exclusive : 'मोदींकडून कधीही मदत घेतली नाही, अहमदाबादमध्ये कधी भेटलोही नाही'; अब्बास यांचं स्पष्टीकरण