Anand Mahindra on Thar : देशातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते दररोज काही ना काही ट्विट किंवा पोस्ट करताना पाहायला मिळतात. अनेकदा नवनवीन शोध तर कधी देसी जुगाडचे व्हायरल व्हिडीओही आनंद महिंद्रा शेअर करत असतात. आनंद महिंद्रा अनेक वेळा सोशल मीडियाद्वारे जनसामान्यांसोबत संपर्क साधतात. आता पुन्हा एकदा आनंद महिंद्रा यांनी जनतेला आवाहन केलं आहे.
आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक जण महिंद्रा थार ही गाडी पूर आलेल्या पाण्याचा प्रवाहातून धोकादायक रितीने चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी आवाहन केलं आहे की असा जीवघेणा प्रयत्न करु नका. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'आज मला ही पोस्ट सापडली. मी या चालकाच्या महिंद्रा थारवरील विश्वासाचं कौतुक करतो. पण असं करणं अत्यंत धोकादायक आहे. मी थार मालकांना असे धोकादाय स्टंट न करत संयम बाळगण्याचे आवाहन करतो.'
दरम्यान हा महिंद्रा यांनी व्हिडीओ ट्विट केल्यानंतर त्यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विटवर एका युजरने आनंद महिंद्रा यांना प्रश्न विचारला. या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत उत्तर दिलं आहे. एका युजरने आनंद महिंद्रा यांना ट्विट करत प्रश्न विचारला की, 'महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी उत्साही आणि धाडसी लोकांसाठी ट्रॅक सुरु करु शकतो का, जिथे त्यांना त्यांची कौशल्यं आणि क्षमता तपासण्याची संधी मिळेल.'
ट्विटरवर सक्रिय असणारे आनंद महिंद्रा यांनी या ट्विटला उत्तर देत सांगितलं आहे की, 'उत्साही आणि धाडसी लोकांसाठी आम्ही आधीच हे केलं आहे. महाराष्ट्रातील इगतपुरी येथे महिंद्रा अॅडव्हेंचर ऑफ-रोड ट्रेनिंग अॅकॅडमी उघडून आम्ही लोकांना त्यांचं कौशल्यं आणि क्षमता तपासण्याची संधी दिली आहे. पण बहुतेक आता आम्हाला देशभरात आणखी काही ठिकाणी ट्रॅक सुरु करावे लागणार आहेत.'
आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते अनेक नवीन आणि आधुनिक संकल्पनांना संधी देताना दिसतात. त्यामुळे येत्या काळात देशभर महिंद्रा अॅडव्हेंचर ऑफ-रोड ट्रेनिंग अॅकॅडमीच्या शाखा सुरु झाल्या तरी त्यामध्ये नवल वाटायला नको.
संबंधित इतर बातम्या
- Anand Mahindra : 11 वर्षांची मेहनत फळाला! श्रीनगरच्या अहमदने बनवली सोलर कार, आनंद महिंद्रांची सोबत काम करण्याची इच्छा
- Anand Mahindra Tweet: नगरच्या फोल्डिंग जिन्याचे आनंद महिंद्रा यांना कौतुक, जागेअभावी केलेल्या जुगाडाचा व्हिडीओ व्हायरल
- Anand Mahindra Tweet: स्टूलचा नाविण्यपूर्ण वापर करत गुडघाभर पाण्यातून वाट; आनंद महिंद्रांनी केलं जुगाडू युवकाचं कौतुक, म्हणाले...