AK-203 Assault Rifles : भारत-रशिया यांच्यात नुकत्याच झालेल्या एके-203 असॉल्ट रायफल (AK-203 Assault Rifles) करारामुळे भारतीय सैनिकांना आधुनिक आणि घातक एके 203 रायफल्स मिळणार आहेत. मेक इन इंडियाच्या अंडर उत्तर प्रदेशच्या अमेठी येथे ही निर्मिती केली जाणार असून तब्बल 5 लाख एके 203 रायफल्स तयार करणार आहेत. 5 हजार 100 कोटींच्या या करारावर आज (6 डिसेंबर) नवी दिल्ली येथे भारताचे रक्षामंत्री राजनाथ सिंह आणि रशियाच्या सर्गेई शोइगु यांनी सह्या केल्या.
भारताने या एके-203 रायफलला 'एक रायफल, श्रेष्ट रायफल' अशी टॅगलाइन दिली आहे. या बंदुकींचा निर्माण अमेठीच्या कोरबा ओएफबी प्लांटमध्ये केला जाणार आहे. या रायफल्स तयारीसाठी एक नवी कंपनी तयार करण्यात आली असून 'इंडिया रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड' असं नाव देण्यात आलं आहे. या रायफलमुळे आतंकवादाला सडेतोड उत्तर देता येणार असल्याचं यावेळी सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान या दमदार रायफलमध्ये काही खास फिचर्स असून यावर एक नजर फिरवुया...
AK-203 रायफल्सची काही वैशिष्ट्ये
- 7.62 X 39mm कॅलिबरची एके-203 रायफल्स या भारतीय सैन्य मागील तीन दशकं वापरत असलेल्या इन्सास (INSAS) रायफलची जागा घेणार आहे.
- ही बंदूक तब्बल 300 मीटरच्या रेंजपर्यंत निशाणा साधू शकते. याचा अर्थ तब्बल तीन फुटबॉलच्या मैदानांइतकी रेंज ही बंदुक साधू शकते. तसंच कमी वजन आणि टिकाऊ अशीही या बंदुकीचं वैशिष्ट्य आहे.
- ही राइयफल 7.62 एमएमचे मोठे राउंड फायर करु शकते. तर याप्रकारच्या इतर रायफल्स केवळ 5.56 एमएम राउंडच फायर करु शकतात.
- या नव्या रायफलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह स्पेशल साईट ग्रिपसारखी सुविधा आहे. ज्यामुळे बंदुक हाताळणं सोपं होणार आहे.
संबंधित बातम्या
- इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलेल्या भारतीय व्यक्तिमत्वात PM Modi पहिल्या स्थानावर
- 'जर लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर फोटो छापता, तर मग मृत्यूंची जबाबदारीही घ्या', खा. अमोल कोल्हेंची पंतप्रधान मोदींवर आक्रमक टीका
- One Year of Farmers Protest : ऊन, वारा, पाऊस अन् लाठीचार्ज, तरीही निर्धार ठाम; बळीराजाच्या आंदोलनाचं एक वर्ष!