नवी दिल्ली : कारमधील पुढच्या सीटवरील प्रवाशांसाठी एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निवेदनानुसार नवीन कार मॉडेलच्या निर्मितीवर हा नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू होईल. त्याचबरोबर हा नियम 31 ऑगस्ट 2021 पासून जुन्या कार मॉडेलवर लागू होईल. वाहन मानकांवरील तांत्रिक समितीने एअरबॅग बसवण्यास मान्यता दिली होती. वाहनांमध्ये अधिक संरक्षणात्मक उपाय असले पाहिजेत, यासाठी कुणाचीही विरोध नसेल. जेणेकरून अपघाताच्या वेळी लोकांचे आयुष्य सुरक्षित राहिल.





एअरबॅग का महत्वाचे आहेत?


कारमधील एअरबॅग्ज अपघातात बसलेल्या चालक आणि प्रवाशांचे प्राण वाचवतात. कारची धडक होताच एअरबॅग बाहेर येतात आणि कारमध्ये बसलेल्या प्रवाशांची डॅशबोर्ड किंवा कारच्या स्टियरिंगला धडक होत नाही आणि त्याचा जीव वाचू शकतो.


एअरबॅग्स SRS (Supplemental Restraint System) नावानेही ओळखल्या जातात. आपण आपली कार सुरू करताच कार मीटर इंडिकेटरमधील एसआरएस लाईट काही सेकंदासाठी सुरु होतात. जर एसआरएस इंडिकेटर काही सेकंदांनंतर बंद होत नसेल किंवा सुरु होत नसेल तर एअरबॅगमध्ये काहीतरी गडबड आहे असं समजलं जातं.


एयरबॅग कसं काम करतात?


कारच्या बम्परवर इम्पॅक्ट सेन्सर लावलेलं असतं. कारला एखाद्या वस्तूची धडक लागताच इम्पॅक्ट सेन्सरच्या मदतीने एअरबॅग सिस्टममध्ये एक छोटासा कंरट येतो आणि एअरबॅगमधील sodium azide गॅस एअरबॅगमध्ये भरला जातो ज्यामुळे गॅस वायू तयार होतो आणि एअरबॅग बाहेर येतात.


एक सेकंदात एअरबॅग्स उघडतात


एअरबॅग्ज कॉटन कापडापासून बनवल्या जातात. परंतु त्यावर सिलिकॉनची कोटिंग केली जाते. एअरबॅग उघडण्यास एका सेकंदापेक्षा कमी (सुमारे 1/20 सेकंद) वेळ घेतात. एअरबॅग्स उघडण्याची गती 300 किमी प्रती तासच्या आसपास असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारचं सीट बेल्ट फक्शन एअरबॅगशी लिंक असतं. म्हणून जेव्हा आपण कारमध्ये बसता तेव्हा सीट बेल्ट लावा, केवळ एअरबॅग्सवर अवलंबून राहू नका.