National Air Sports Policy : देशात आज नॅशनल एअर स्पोर्ट्स पॉलिसी लॉन्च (National Air Sports Policy) करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थित होते. देशातील हवाई स्पोर्ट्स कल्चरला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना लॉन्च करण्यात आली आहे. यामुळे देशातील स्पोर्ट्स कल्चरचा विकास होण्यास मदत होणार आहे. यामुळे खासकरून डोंगराळ भागात रोजगार उपलब्ध होणार आहे. 2030 पर्यंत जगातील सर्वोत्कृष्ठ देशामध्ये भारताची गणना केली जावी, हे भारताचे लक्ष्य आहे.


एअर स्पोर्ट्सअंतर्गत येणारे खेळ


एअर स्पोर्ट्सअंतर्गत एअर रेसिंग, एरोबेटिक्स, एअरोमॉडलिंग, हँग ग्लायडिंग, पॅरा ग्लायडिंग, पॅरा मोटरिंग आणि स्काय डायव्हिंगसारख्या खेळांचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सध्या भारत अशा कोणत्याच स्पर्धेत सध्या सहभागी होत नाही. परंतु लवकरच भारत अशा स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे.


ज्योतिरादित्य सिंधिया  म्हणाले, भारताचे भौगौलिक क्षेत्र मोठे आहे. भारताच्या अनेक भागात या खेळांसाठी पोषक वातावरण आहे. भारत हा तरूणांचा देश आहे. त्यामुळे ही योजना अनेक या खेळाची आवड असणाऱ्या तरूणांच्या पंखांना बळ देणार आहे. 


रोजगार वाढण्यास मदत


एअर स्पोर्ट्ससारख्या खेळांमुळे ट्रॅव्हेल ग्रोथ, पर्यटन तसेच स्थानिक रोजगार वाढण्यास मदत होणार आहे. त्यासाठी संपूर्ण देशात एअर स्पोर्ट्स हब बनवण्यात येणार आहे. जगभरातील एअर स्पोर्ट्स प्रोफेशनल खेळाडू येतील. त्यामुळे देशाला मोठा फायदा होणार आहे.


सध्या भारतात 'या' खेळांना मान्यता



  • एअरोबेटिक्स

  • एअरोमॉडलिंग आणि मॉडेल रॉकेटरी

  • बलूनिंग

  • ड्रोन्स

  • ग्लायडिंग आणि पॉवर ग्लायडिंग

  • हँग ग्लायडिंग आणि पॉवर्ड हँग ग्लायडिंग

  • पॅराशूटिंग (स्कायडायव्हिंग, बेस - 1 जम्पिंग आणि विंग सूट्स)

  • पॅराग्लायडिंग आणि पॅरा मोटरिंग (पॉवर्ड पॅराशूट ट्राईक्स)

  • पॉवर्ड एअरक्राफ्ट (अल्ट्रा लाईट, मायक्रो लाइट आणि लाइट स्पोर्ट्स एअर क्राफ्ट्स)

  • रोटर क्राफ्ट