Air India Urination Incidence : न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) विमानात मद्यधुंद अवस्थेत महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रा (Shankar Mishra) याला दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) अटक केली आहे. 


बंगळुरूमध्ये मिश्राचं लास्ट लोकेशन 


शंकर मिश्राचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली होती. शंकर मिश्राचं शेवटचं लोकेशन बंगळुरूमध्ये सापडलं होतं. त्याच्या आधारे शंकर मिश्राचा शोध घेण्यात आला. मात्र, मिश्रा त्याचा फोन सातत्यानं बंद करत होता. त्यामुळे त्याला शोधण्यात अनेक अडचणी आल्या. अखेर त्याला अटक करण्या बंगळुरू पोलिसांना यश आलं आहे. 


शंकर मिश्राची कंपनीकडून हकालपट्टी 


शंकर मिश्रावरील गंभीर आरोपांमुळे तो काम करत असलेली कंपनी वुल्फ फार्गोनं त्याला नोकरीवरून काढून टाकलं होतं. कंपनीच्या वतीनं एक निवेदन जारी करताना म्हटलं होतं की, कंपनी आपल्या कर्मचार्‍यांकडून व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या योग्य वर्तनाची अपेक्षा करते. शंकर यांच्यावरील आरोप अत्यंत खेदजनक असून त्यामुळे त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात येत आहे. या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करू, असंही कंपनीनं म्हटलं आहे.




विमान कंपनीकडून नुकसानभरपाईची तक्रार 


एअर इंडियाच्या विमानातील लघुशंका प्रकरणात शंकर मिश्रा यांच्या वकिलांनी आरोपीचं म्हणणं ठेवत सांगितलं होतं की, या घटनेनंतर महिलेनं शंकरला माफ केलं होतं. व्हॉट्स अॅपवरील चॅटद्वारे याची पुष्टी झाली आहे. शंकरनं कपडे धुवून पाठवून दिल्याचं तसेच नुकसान भरपाई म्हणून 15 हजार रुपयेही देण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. ही रक्कम महिलेच्या मुलीनं परत केली. विमान कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून महिलेनं ही तक्रार केली आहे, असंही निवेदनात म्हटलं होतं.  


प्रकरण नेमकं काय? 


26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या विमानात आपल्या सहप्रवाशावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शंकर मिश्रा याने लघवी केली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. परंतु, तो अद्याप मिळून आलेला नाही. आरोपी शंकर मिश्रा याच्या वडिलांचं पालघर मधील बोईसर येथे हॉटेल आहे. शंकर मिश्रा कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेल्या वेल्स फार्म या अमेरिकन बहुउद्देशीय वित्तीय सेवा  इंडिया चापटर कंपनीचा उपाध्यक्ष देखील आहे. या घटनेने शंकर मिश्रा यांच्या कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला असून हे आरोप बिनबुडाचे असल्याचं शंकर मिश्रा यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. तर या महिलेने शंकर मिश्रा याच्याकडून काही पैसे उकळले असून ती ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप शंकर मिश्रा यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


आधी दारू प्यायला, नंतर महिलेच्या अंगावर लघवी केली, अघोरी कृत्य आलं अंगलट, जाणून घ्या काय आहे प्रकरण