Wells Fargo Sacks India VP Shankar Mishra : एअर इंडियाच्या विमानात आपल्या सहप्रवाशावर मद्यधुंद अवस्थेत लघवी केलेल्या शंकर मिश्रा व्यक्तीला अमेरिकन फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी वेल्स फार्गोने कामावरून काढून ठाकले आहे. एअर इंडियाच्या फ्लाइटच्या बिझनेस क्लासमध्ये मद्यधुंद अवस्थेत शंकर मिश्रा याने 70 वर्षीय महिलेवर लघवी केल्याच्या त्याच्यावर आरोप आहे. तेव्हापासून हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. 26 नोव्हेंबर 2022 रोजी हे विमान न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला येत होते तेव्हाची ही घटना आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी वेल्स फार्गोचे म्हणणे आहे की, शंकर मिश्रा याला कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे. आम्ही कायद्यासोबत असून अघोरी कृत्यू करणाऱ्या शंकर याला चौकशीसाठी नोटीस दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, शंकर मिश्रा हा मुंबईचा रहिवासी असून मुंबईतील त्याच्या ओळखीच्या ठिकाणी आम्ही आमचे पथक पाठवले होते. मात्र तो फरार आहे. आमचे पथक त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मिश्राविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 294 (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य), 354, 509 आणि 510 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाचे अधिकारी आणि न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटच्या केबिन क्रूला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  विमान हवेत असताना कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल कारवाई करण्यास सांगितले आहे.  


नक्की काय झालं होतं? 
26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या विमानात आपल्या सहप्रवाशावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शंकर मिश्रा याने लघवी केली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. परंतु, तो अद्याप मिळून आलेला नाही. आरोपी शंकर मिश्रा याच्या वडिलांचं पालघर मधील बोईसर येथे हॉटेल आहे. शंकर मिश्रा कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेल्या वेल्स फार्म या अमेरिकन बहुउद्देशीय वित्तीय सेवा  इंडिया चापटर कंपनीचा उपाध्यक्ष देखील आहे. या घटनेने शंकर मिश्रा यांच्या कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला असून हे आरोप बिनबुडाचे असल्याचं शंकर मिश्रा यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. तर या महिलेने शंकर मिश्रा याच्याकडून काही पैसे उकळले असून ती ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप शंकर मिश्रा यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या


दिल्लीच्या अंजली अपघात केसमध्ये नवा ट्विस्ट, रात्री दोन वाजता धावताना दिसली मैत्रीण, जाणून घ्या नेमकं काय घडलं त्या रात्री