Air India : टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडियाने आपल्या वैमानिकांना वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत उड्डाण करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. विमान कंपनी  त्यांच्या फ्लीट विस्तार योजनेवर काम करत आहे.  


डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) पायलटना वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत उड्डाण करण्याची परवानगी देतात. विमान वाहतूक उद्योगातील बहुतेक विमान कंपन्यांमध्ये ही पद्धत आहे की पायलट वयाच्या 65 वर्षापर्यंत विमान उडवू शकतात. याशिवाय आणखी 200 हून अधिक विमाने खरेदी करण्याचा विचार एअर इंडियामध्ये सुरू आहे. त्यापैकी 70 टक्के नॅरो बॉडी विमाने असू शकतात. बिझनेस टुडेने विमान उद्योगातील सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


अहवालातल्या माहितीनुसार,  एअरलाइन्सच्या दस्तऐवजांमध्ये भविष्यातील विस्ताराच्या योजना लक्षात घेता कर्मचाऱ्यांची गरज पूर्ण करणे आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. कंपनीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एअर इंडियामधील विद्यमान प्रशिक्षित वैमानिकांच्या सेवा निवृत्तीनंतर पाच वर्षांसाठी कराराच्या आधारावर 65 वर्षांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.


पुढील दोन वर्षांत निवृत्त होणाऱ्या वैमानिकांच्या पात्रतेची तपासणी करण्यासाठी मानव संसाधन (एचआर) विभाग, ऑपरेशन्स विभाग आणि फ्लाइट सेफ्टी विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात येईल. या समितीवर शिस्त, उड्डाण सुरक्षा आणि दक्षता यासंबंधी वैमानिकांच्या मागील रेकॉर्डचे पुनरावलोकन करण्याची जबाबदारी असेल. सविस्तर आढावा घेतल्यानंतर ही समिती सेवानिवृत्तीनंतर कंत्राट देण्यासाठी मानव संसाधन विभागाच्या प्रमुखांना निवडलेल्या नावांची शिफारस करेल.


पाच वर्षांनी करार वाढवता येतो


"करार 5 वर्षांच्या कालावधीसाठी जारी केला जाईल. वयाच्या 63 व्या वर्षी समाधानकारक सेवेची पाच वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांच्या कामगिरीची तपासणी करून ती 65 वर्षां पर्यंत वाढविण्याचा विचार समिती करेल.


महत्वाच्या बातम्या


Job Majha : एअर इंडिया एअर सर्व्हिसेसमध्ये मोठी पदभरती; असं करा अप्लाय 


टाटाच्या एअर इंडिया आणि एअर एशिया यांच्यात मोठा करार, तुम्हाला होणार 'हा' फायदा