Ukraine-Russia War : ऑपरेशन गंगा अंतर्गत एअर इंडियाचे 5 वे विमान भारतात दाखल झाले आहे. 249 जण सुखरुप मायदेशात दाखल झाले आहेत. गेल्या तीन दिवसात 1 हजार 156 नागरिक भारतात पोहोचले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह इतर भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे विमान (AI 1942) सकाळी साडेसहा वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. या विमानाने बुखारेस्टहून दिल्लीसाठी भारतीय वेळेनुसार 12:30 वाजता उड्डाण केले होते. 


गेल्या पाच दिवसापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे तिथे भितीदायक स्थिती निर्माण झाली आहे. अशात अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आज 249 भारतीय नागरिकांसह एअर इंडियाचे पाचवे दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहे. 


26 फेब्रुवारी: 219 भारतीय नागरिक दाखल
27 फेब्रुवारी: 250 
27 फेब्रुवारी: 240 
27 फेब्रुवारी: 198 
28 फेब्रुवारी: 249 


दरम्यान, भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले की, भारताने आत्तापर्यंत युक्रेनमधून सुमारे 2,000 नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. त्यापैकी 1,000 हंगेरी आणि रोमानिया मार्गे चार्टर्ड विमानांनी घरी परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.  


 





युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये मागील पाच दिवसांपासून युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने Operation Ganga सुरु केले आहे. त्याअंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणले जात आहे. त्याशिवाय युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी OpGanga helpline नावाचे ट्विटर अकाऊंट उघडण्यात आले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसंबंधित सर्व प्रश्न या ट्विटर अकाऊंटवर टाकल्यास उत्तर देण्यात येणार आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: