Asaduddin Owaisi on Namaz Controversy : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asduddin Owaisi) यांनी मुरादाबादमधील नमाज वादावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) प्रश्न केला आहे. मुस्लिमांना अशी वागणूक किती दिवस देणार? असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.






नमाज अदा करण्यासाठी सरकार तसेच पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल का? 
असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ओवेसी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "भारतातील मुस्लिम आता घरीही नमाज अदा करू शकत नाहीत? आता नमाज अदा करण्यासाठी सरकार/पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल का? याचे उत्तर नरेंद्र मोदींनी द्यावे, ओवेसींनी यापुढे लिहिले आहे की, "समाजात कट्टरतावाद इतका पसरला आहे की, आता इतरांच्या घरी नमाज अदा केल्यानेही लोकांच्या भावना दुखावल्या जातात."


 


काय प्रकरण आहे?


उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील छजलैत पोलीस स्टेशन हद्दीतील दुल्हापूर गावात लोकांनी नमाज पढून दुसऱ्या बाजूने गावात द्वेष, वैर आणि वैमनस्य पसरवले जात असल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली आहे. सामूहिक नमाज अदा केल्याप्रकरणी पोलिसांनी 16 नामांकित आणि 10 अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी नमाज अदा करणाऱ्यांविरुद्ध कलम 505 (2) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गावात एकही मशीद किंवा मदरसा नाही, त्यामुळे घरात नमाज अदा केली जाते, असे सांगितले जात आहे. नमाज अदा करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे


नमाज अदा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी नमाज अदा करणाऱ्यांविरुद्ध कलम 505 (2) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गावात एकही मशीद किंवा मदरसा नाही, त्यामुळे घरात नमाज अदा केली जाते, असे सांगितले जात आहे. नमाज अदा करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Lalbaugcha Raja : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाच्या मूर्तीची आज पहिली झलक, लाडक्या बाप्पाचे दर्शन होणार


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून दखल, टोलनाक्यांवर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश