Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशातील बहुतांश नागरिकांचा शेती हा एक पारंपरिक व्यवसाय आहे त्यामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनं देखील अशाच एक योजनेची सुरुवात केली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र होऊ शकतात, यासंदर्भातील माहिती पाहुयात.
राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी आता 12000 रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. पूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 6000 रुपये शेतकऱ्यांना दिले जात होते. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत 6000 रुपयांचे सहाय्य केले जाणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आता वर्षाला 12000 रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
या योजनेची पात्रता काय?
फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करावा
शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे.
अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
अर्जदार शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांनाच दिला जाईल.
शासकीय सेवेत काम करत असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवाशी दाखला
मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
उत्पन्नाचा दाखला
बँक खात्याचा तपशील
जमिनीचे कागदपत्रे 7/12 व 8अ
पासपोर्ट आकाराचे फोटो
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जावे लागेल.
कृषी विभागातून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जमा करावी लागतील व सदर अर्ज जमा करावा लागेल.
अशा प्रकारे तुमची नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
पहिला टप्पा
अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
होम पेज वर नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अर्जदाराची विचारलेली सर्व माहिती (अर्जदाराचे संपूर्ण नाव, वय) भरावी लागेल.
सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुमची नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
दुसरा टप्पा
होम पेज वर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेवर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्यासमोर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती (अर्जदाराचे संपूर्ण नाव,पत्ता,आधार कार्ड नंबर,बँक खात्याचा तपशील,इत्यादी) भरावी लागेल. सर्व माहिती भरून झाल्यावर योग्य ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुमची नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
नमो शेतकरी सन्माननिधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या: