Gold Silver Rate: भारतात सणासुदीचा हंगाम सुरु आहे. या काळात लोक मोठ्या प्रमाणावर सोने चांदी खरेदी करतात. दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. यावर्षी धनत्रयोदशीचा सण 10 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे.  याआधी आज (2 नोव्हेंबर 2023 ) सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. आज सोन्याचा भाव 62000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे.


फ्युचर्स मार्केटमध्ये आज सोन्याचा दर 60,890 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर उघडला होता. यानंतर, त्याच्या किंमतीत आणखी वाढ दिसून आली आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 128 रुपयांची म्हणजेच 0.21 टक्क्यांची वाढ झाली आहे. आज सोने 60 हजार 913 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. काल सोन्याचा भाव 60 हजार 785 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला आहे.


चांदीच्या दरातही झाली वाढ 


सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही वाढ होत आहे. आज चांदीचा बाजार उघडल्यानंतर चांदीचे दर हे 71 हजार 690 रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडला. यानंतर, त्याच्या किंमतीत आणखी वाढ नोंदवण्यात आली आहे. आज चांदीच्या दरात कालच्या तुलनेत 533 रुपयांची म्हणजेच 0.75 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या चांदी 71 हजार 831 रुपये प्रति किलो (आज चांदीची किंमत) या पातळीवर आहे. बुधवारी वायदे बाजारात चांदीचा भाव 71 हजार 298 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.


देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दर किती?


नवी दिल्ली- 24 कॅरेट सोने 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,800 रुपये प्रति किलो
कोलकाता- 24 कॅरेट सोने 61,640 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,800 रुपये प्रति किलो
चेन्नई- 24 कॅरेट सोने 62,130 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 77,700 रुपये प्रति किलो
मुंबई- 24 कॅरेट सोने 61,640 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,100 रुपये प्रति किलो
नोएडा- 24 कॅरेट सोने 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,800 रुपये प्रति किलो
पाटणा- 24 कॅरेट सोने 61,690 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,800 रुपये प्रति किलो
जयपूर- 24 कॅरेट सोने 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,800 रुपये प्रति किलो
लखनौ- 24 कॅरेट सोने 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,800 रुपये प्रति किलो
गुरुग्राम- 24 कॅरेट सोने 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,800 रुपये प्रति किलो
गाझियाबाद- 24 कॅरेट सोने 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,800 रुपये प्रति किलो
अमृतसर- 24 कॅरेट सोने 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,800 रुपये प्रति किलो
कानपूर- 24 कॅरेट सोने 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,800 रुपये प्रति किलो


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ 


देशांतर्गत बाजाराशिवाय आज आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मेटल रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव कालच्या तुलनेत 0.08 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचवेळी, चांदीच्या किंमतीतही 1.25 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.