Strawberry and Dragon Fruit Cultivation : शेतीत क्षेत्रात शेतकरी (Farmers) सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जात आहे. शेतकऱ्यांसमोर विविध संकट असताना देखील काही शेतकरी उत्तम प्रकारची शेती करत आहेत. आता पुरुषांच्या बरोबरीने महिला देखील उत्कृष्ट शेती करत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातील मिर्झापूरच्या (mirzapur) वंदना सिंह (vandana singh). त्यांनी युट्यूबवर व्हिडीओ पाहून ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) आणि स्ट्रॉबेरीची (Strawberry) यशस्वी शेती केली आहे. आज त्या वर्षाला पाच लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवत आहेत. पाहूयात वंदना सिंह यांची यशोगाथा...
मिर्झापूरच्या वंदना सिंग यांनी ड्रॅगन फ्रूट आणि स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली आहे. या शेतीतून त्या वार्षिक 5 लाखाहून अधिक रुपयांचे उत्पादन मिळवत आहेत. आज वंदना सिंह यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवली आहे. मिर्झापूर येथील रहिवासी असलेल्या वंदना सिंह आपल्या अर्धा एकर शेतात ड्रॅगन फ्रूट आणि स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. यातून त्या दरमहा हजारो रुपये कमवत आहेत. वंदना सिंह यांनी युट्यूबवर व्हिडीओ पाहून ड्रॅगन फ्रूट आणि स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर याबाबतची अधिक माहिती त्यांनी कृषी विभागाकडू मिळवली.
ड्रॅगन फ्रूटच्या रोपांची नर्सरीतून लाखोंचा नफा
ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून चांगला नफा घेतल्यानंतर वंदना सिंह यांनी आता आपल्या शेतीचा विस्तार केला आहे. आता त्यांनी ड्रॅगन फ्रूटच्या रोपांची नर्सरी सुरु केली आहे. ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी दगडी खांब, लोखंडी तार, शेणखत यांचा वापर केला जातो. शेतीतून पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी फारसा नफा झाला नसला तरी तिसऱ्या वर्षी मोठ्या प्रमाणात नफा झाला. आज नर्सरीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूटची रोपे तयार केली जातात. एक रोप 50 रुपयांना विकले जाते. तर दुसरीकडे वाराणसीमध्ये 400 रुपये किलो दराने ड्रॅगन फ्रूटची विक्री केली जात आहे.
यूट्यूब आणि कृषी विभागाच्या मदतीने यशस्वी शेती
यूट्यूबच्या माध्यमातून मिळालेली माहिती आणि कृषी विभागाच्या मदतीने ड्रॅगन फ्रूट आणि स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करणं शक्य झालं आहे. ड्रॅगन फ्रूटची शेती महिलांसाठी उत्तम आहे, कारण घर सांभाळत महिला काही काळ शेतात काम करुन चांगले पैसे कमवू शकतात. ड्रॅगन फ्रूट शेतीच्या माध्यमातून दुप्पट नाही तर चौपट उत्पन्न मिळवलं जाते. वंदना सिंह यांना ड्रॅगन फ्रूट लागवडीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. आता अतिरिक्त उत्पन्नासाठी वंदना सिंह या हळद लागवडीकडे वळल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: