Agricultural University : भारताला (India) कृषीप्रधान देश म्हटले जाते. देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. कृषी क्षेत्राच्या वाढीसह प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मागणीही सातत्याने वाढत आहे. विद्यार्थ्यांना कृषी विषयात पदवी मिळवण्यात रस आहे. आजच्या काळात देशभरात अनेक सरकारी आणि निमसरकारी विद्यापीठे कार्यरत आहेत. पण तुम्हाला देशातील पहिल्या कृषी विद्यापीठाविषयी माहिती आहे का? आज आपण देशातील पहिल्या कृषी विद्यापीठाविषयी माहिती पाहणार आहोत. 


विविध अहवालांनुसार, भारतातील पहिले कृषी विद्यापीठ गोविंद बल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. ज्याला "पंतनगर विद्यापीठ" आणि "पंत विद्यापीठ" असेही म्हणतात. 17 नोव्हेंबर 1960 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या विद्यापीठीचे उद्घाटन करण्यात आले होते. तेव्हा त्याला उत्तर प्रदेश कृषी विद्यापीठ म्हटलं जातं होतं. 1972 मध्ये, थोर स्वातंत्र्य सेनानी गोविंद बल्लभ पंत यांच्या नावाने कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे नाव बदलून गोविंद बल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ करण्यात आले. हे विद्यापीठ उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातील पंतनगर शहरात आहे. हे विद्यापीठ देशातील हरित क्रांतीचे प्रणेते मानले जाते.


कृषी क्षेत्रात संधी


आज कृषी क्षेत्रात अनेक संधी आहेत. कृषी पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थी कृषी संशोधन शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, उत्पादन व्यवस्थापक, शेती व्यवस्थापक इत्यादी बनू शकतात.


सरकारी नोकरी


कृषी क्षेत्रातील पदवी किंवा पदविकाधारकांना कृषी विभाग, कृषी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे इत्यादींमध्ये सरकारी नोकऱ्या मिळतात. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये कृषी अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी विस्तार अधिकारी यांचा समावेश होतो.


खासगी नोकरी


कृषी क्षेत्रात अनेक खाजगी कंपन्या देखील आहेत ज्या कृषी उत्पादनांचे उत्पादन, प्रक्रिया आणि मार्केटिंग करतात. कृषी क्षेत्रातील पदवी किंवा पदविकाधारकांना या संस्थांमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रात काम करणारे लोक म्हणजे कृषी उत्पादन व्यवस्थापक, कृषी अभियंता, कृषी व्यापारी करतात.


स्वत: चा व्यवसाय


कृषी क्षेत्रातील पदवी किंवा पदविकाधारकही स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात. कृषी क्षेत्रात शेती, पशुपालन, दुग्धव्यवसाय, कृषी उपकरणांचा व्यापार इत्यादी सुरू करता येतील.