Taj Mahal : जगातील आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहाल संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने स्पष्टीकरण गेत म्हटलं आहे की, ताजमहालामधील 22 खोल्यांमध्ये कोणतंही रहस्य नाही. देखभालीसाठी, अनेकदा या खोल्या उघडल्या आणि स्वच्छ केल्या जातात. त्या 22 खोल्यांमध्ये आजपर्यंत काहीही संशयास्पद दिसले नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या खोल्या उघडण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावल्याने हा दावा महत्त्वाचा ठरतं आहे.
देखभालीसाठी अनेक वेळा या खोल्या उघडण्यात आल्या
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) माहितीनुसार, या खोल्यांच्या संवर्धनाचं काम करण्यात आलं होतं. डिसेंबर 2021, जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 मध्ये करण्यात आलं. यासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च करण्यात आलं. या खोल्यामध्ये डागडुजी करण्यात आली. भिंतीवरील तडे भरण्यात आले. तसेच तळघरांमुध्ये चुन्याचं कामही करण्यात आलं.
शिवाय या तळघरांची 2006 आणि 2007 मध्येही दुरुस्ती करण्यात आली आहे. ही सर्व माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या वेबसाईटवर सतत अपडेट केली जाते. नुकतेच उघडलेल्या खोल्यांचे फोटोही वेबसाईटवर समोर आले आहेत. मात्र ज्या याचिकाकर्त्यांनी खोल्या उघडण्याची मागणी केली आहे, त्यांनी याबाबत पुरेशी माहिती नसावी.
काय म्हणाले पुरतत्व विभागाचे अधिकारी?
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताजमहालामध्ये 22 नाही तर 100 हून अधिक खोल्या आहेत. यांना कोठर असंही म्हटलं जातं. ताजमहालमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 100 हून अधिक खोल्या आहेत. ताजमहालबाबत परिचित असलेले आणि ASI मधील वरिष्ठ संवर्धन सहाय्यक एस. के. शर्मा आता निवृत्त झाले आहेत. त्यांनी सांगितले की, ताजमहालमध्ये पगोडा आणि कोणत्याही हिंदू धार्मिक स्थळाची चिन्हे त्यांना दिसलेली नाहीत, तर संवर्धनाच्या कामासाठी त्या खोल्यांना सतत उघडल्या जातात.
ते म्हणतात की 77 मध्ये पूर आला तेव्हाही ताजच्या मागील बाजूस एक जाळी उघडी होती. तोही बंद होता. एसके शर्मा सांगतात की, मला कधीच वाटले नाही की येथे हिंदू धार्मिक चिन्हे आहेत. त्यांच्या मते, तळघर पूर्वेकडून पश्चिमेकडे उघडतात.
म्हत्त्वाच्या इतर बातम्या