मुंबई : कोरोनाच्या भयंकर असलेल्या डेल्टा व्हेरिएंटच्या प्रभावातून आता कुठे जग बाहेर येत असताना पुन्हा जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाच्या महाभयंकर अशा लॅम्बडा व्हेरिएंटचा शोध लागला असून तो डेल्टा प्लस व्हेरिएंटपेक्षाही अधिक धोकादायक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लॅम्बडा व्हेरिएंटचा प्रसार सध्या जगभरातील 30 देशांमध्ये झाला आहे. भारतात मात्र अद्याप या व्हेरिएंटचा एकही रुग्ण सापडला नसल्याचं वृत्त आहे.
लॅम्बडा या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा उगम आफ्रिकेतल्या पेरु या देशात झाल्याचं सांगण्यात येतंय. या व्हेरिएंटला C.37 असं नाव देण्यात आलं असून याचा प्रसार मलेशिया, ब्रिटनसहित 30 देशांमध्ये झाला आहे. कोरोनामुळे सध्या सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या प्रमाणाबाबत पेरु या देशाचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. पेरुमध्ये मे आणि जूनमध्ये सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी 82 टक्के रुग्णांमध्ये लॅम्बडा व्हेरिएंट सापडला असून त्यानंतर चिली या देशात याचा प्रादुर्भाव जास्त आहे.
मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केलं असून त्यामध्ये सांगण्यत आलं आहे की, डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही लॅम्बडा व्हेरिएंटचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो आणि डेल्टाच्या तुलनेत हा व्हेरिएंट अधिक धोकादायक आहे.
लॅम्बडा व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होऊ शकतो आणि कोरोनाच्या लसीमुळे शरीरात निर्माण झालेल्या अॅन्टिबॉडी नष्ट करण्याची क्षमता या व्हेरिएंटमध्ये असल्याचं सांगण्यात येतंय. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटला 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' (Variant of Interest)या प्रकारात टाकलं आहे.
भारतात या व्हेरिएंटचा अद्याप एकही रुग्ण सापडला नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. पण तरीही या व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- नवनिर्वाचित मंत्री आज पदभार स्वीकारणार; पंतप्रधानांनी बोलावली कॅबिनेट आणि मंत्रीपरिषदेची बैठक
- Ratnagiri Refinery : रिफायनरीसाठी समर्थक देखील अॅक्शन मोडमध्ये; शिवसैनिकाच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
- Gold Silver Price Today : सोनं 220 रुपयांनी महागलं तर चांदी 600 रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे भाव