मुंबई : अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे साम्राज्य आल्याने याचा परिणाम सुक्या मेव्यावर  होताना दिसत आहे. अफगाणिस्तानमधून मोठ्या प्रमाणात सुक्या मेव्याची आवक वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये होत असते. मात्र आता तालिबानने अफगाणिस्तानमध्ये घातलेल्या उन्मादामुळे सुक्या मेव्याची आवक मंदावणार असल्याने दरात वाढ होताना दिसत आहे. 

भारतात अफगाणिस्तानातून वर्षांला 38 हजार 650 लाख डॉलरची उलाढाल सुक्या मेव्याची होत असते. सुक्यामेव्याचे बाजारभाव मार्केटमध्ये वाढले असून तालिबानच्या नावाखाली मुंबई एपीएमसी बाजारात सुकामेव्याचे बाजारभाव व्यापाऱ्यांनी वाढवले आहेत. अद्याप जुनाच सुकामेवा बाजारात असून  नविन माल न आल्याने येणाऱ्या सणासुधीच्या काळात याची कमतरता भासणार आहे. गणपती, दसरा, दिवाळी सणाच्या दरम्यान अफगाणिस्तानमधील सुक्या मेव्याची आवक सुरळीत न राहिल्यास भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे. बंद पडलेले अफगाणिस्तानातील बँकिंग क्षेत्र सुरू झाल्यास  पुन्हा माल येण्यास सुरुवात होईल अशी आशा एपीएमसी मधील व्यापारी वर्गाला आहे. सध्या 10 ते 15 टक्यांची भाववाढ सुक्या मेव्या मध्ये झाली आहे. 

मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात सुक्या मेव्या दर्जानुसार सध्याचे किलोचे दर

काळा मनुका  220 - 550 रुपये
अंजीर  200 – 1400 रुपये
जर्दाळू 175 – 800 रुपये
खजूर 100 – 1000 रुपये
शहाजिरा 415 – 500 रुपये
खरजीरा 480 रुपये
काळा किशमिश 280 – 600 रुपये
हिरवा किशमिश 200 ते 800 रुपये 
चिलकुजा 200 ते 4000 रुपये 
कच्चा हिंग  2000 ते 5000 रुपये
अक्रोड   800 ते 1000 रुपये 
बदाम 700 ते 1000 रुपये 
पिस्ता  800 ते 1600 रुपये 

संबंधित बातम्या :