अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान्यांची सत्ता आली आहे. 20 वर्षांपूर्वीची भीतीची परिस्थिती पुन्हा तिथं दिसू लागली आहे. तालिबान्यांच्या दहशतीमुळे अनेकांवर देश सोडून जाण्याची वेळ आली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना आपल्या देशात आणण्याचे मिशन सुरू आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की 15 ऑगस्टपूर्वी ऑपरेशन एअरलिफ्टची तयारी सुरू होती. 15 ऑगस्ट रोजी काबूलमधील भारतीय दूतावासापासून सुमारे 70 मीटर अंतरावर स्फोटाचा आवाज ऐकू आला, त्यानंतर भारतीयांच्या सुरक्षेविषयी चिंता वाढली होती.


दोन पथकं तयार केले होते
काबूलच्या वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या, ज्यात एका टीममध्ये 46 लोक होते. त्यांना 16 ऑगस्टला आणण्यात आले होते. त्याचवेळी, दुसऱ्या टीममध्ये भारताचे राजदूत, 99 आयटीबीपी कमांडो, तीन महिला आणि दूतावास कर्मचारी यांचा समावेश होता. 17 ऑगस्ट रोजी सुमारे 150 लोकांना भारतात आणण्यात आले.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेर पडण्याचा पहिला प्रयत्न 15 ऑगस्टलाच करण्यात आला, जेव्हा सर्वजण विमानतळाकडे रवाना झाले, पण तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. चेक पॉइंटवर एक सशस्त्र तालिबान दिसला, ज्यामुळे या टीमला 15 तारखेला दूतावासात परत यावे लागले.


16 ऑगस्ट रोजी पुन्हा प्रयत्न करण्यात आला आणि जेव्हा ते दुपारी 4 वाजता विमानतळाकडे निघाले तेव्हा दूतावासाच्या बाहेर तालिबान शस्त्रास्त्रांसह उभे होते. अशा स्थितीत विमानतळापासून 15 किमीचे अंतर कापण्याचे मोठे आव्हान होते.


असा दिला चकवा
अशा भितीच्या वातावरणात रात्री 10.30 वाजता टीम पुन्हा एअरबेसकडे रवाना झाली. सशस्त्र लोकांना चकवा देत, दुपारी 3.30 वाजता एअरबेसवर पोहोचले. या दरम्यान रस्त्यांवर लोकांची मोठी गर्दी होती आणि तालिबानी लोकांकडून प्रत्येक किलोमीटरवर बॅरिकेड लावून तपासणी केली जात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दूतावासातून विमानतळावर लोकांना सुरक्षितपणे नेण्यासाठी सुमारे 14 बुलेटप्रूफ कारच्या ताफ्याचा वापर करण्यात आला.


56 तास कोणालाच झोप नाही
सी-17 विमानाने पहाटे 5.30 वाजता उड्डाण घेतले आणि सकाळी 11.15 वाजता गुजरातमध्ये लँड झाले. या ठिकाणी या टीमचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यानंतर या टीमला हिंडन एयरबेसवरती नेण्यात आले. 56 तास चाललेल्या या संपूर्ण मिशनमध्ये ना कोणाला झोप आली, ना कोणी कोणाच्या गळ्याखाली घास गेला. दरम्यान, सध्या अफगानिस्तानमध्ये भारतीय दूतावास बंद करण्यात आला आहे.