नवी दिल्ली : मुस्लिम समुदायाच्या विरोधात वादग्रस्त विधान आण भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी आता भाजपचे माजी प्रवक्ते  आणि वकील असलेले अश्विनी उपाध्याय यांना दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अश्विनी अपाध्याय यांना 50 हजार रुपयांच्या जामीनावर सुटका करण्यात आली आहे. 8 ऑगस्टला अश्विनी कुमार यांनी दिल्लीच्या जंतर-मंतर या ठिकाणी मुस्लिम समुदायाच्या विरोधात भडकाऊ नारेबाजी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 


दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने अश्विनी उपाध्याय यांना जामीन मंजूर करताना म्हटलं आहे की, "भारतीय दंड संहिता कलम 153 ए (दोन धर्म, जाती, वंश या आधारावर द्वेष पसरवणे) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी संशयित त्या ठिकाणी केवळ उपस्थित असल्याने तसेच या व्यतिरिक्त काहीच रेकॉर्डवर नसल्याने त्याने भडकाऊ भाषण दिलं याचा कोणताही पुरावा नाही."


 




मंगळवारी जंतर-मंतर या ठिकाणी मुस्लिम समुदायाच्या विरोधात नारेबाजी, वादग्रस्त वक्तव्य आणि भडकाऊ भाषण प्रकरणी दिल्ली पोलिसांनी भाजपचे माजी  प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांना आणि इतर पाच जणांना अटक केली होती. 


दिल्लीच्या जंतर-मंतर या ठिकाणी मुस्लिम समुदायाच्या विरोधात घोषणाबाजी होत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 188 , 153 ए, 269 आणि 270 या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 


महत्वाच्या बातम्या :