नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'आत्मनिर्भर नारीशक्ती संवाद' या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाग घेणार आहेत. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय आजीविका मिशन (DAY-NRLM) याच्याशी संबंधित बचतगटातील महिलांच्या समुहाशी संवाद साधणार आहेत. 


आज दुपारी 12.30 वाजता 'आत्मनिर्भर नारीशक्ती संवाद' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिला बचतगट समुहांशी संबंधित महिलांची प्रगती, विकास, शेतीच्या विकासामध्ये त्यांचे योगदान या गोष्टींशी संबंधित एका पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत. 


या कार्यक्रमाशी संबंधित पंतप्रधानांनी एक ट्वीट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की, "देशातील बचत गट समुहांची संख्या मोठी आहे. मी आत्मनिर्भर नारीशक्ती या कार्यक्रमात भाग घेणार आहे. या दरम्यान मला समुहातील महिला सदस्यांशी चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या समुहांना काही रक्कम वर्ग केली जाणार असून त्यामुळे त्यांच्या कामाला अधिक गती मिळेल."


 






केंद्र सरकारच्या वतीनं सुरु करण्यात आलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना बचतगटांशी जोडलं जाणे. या माध्यमातून गरीब वर्गाला दीर्घ कालावधीसाठी आर्थिक मदत केली जाते.


महत्वाच्या बातम्या :