Child Adoption Process: गेल्या काही वर्षांत भारतात आणि जगभरात अनाथ मुलांना दत्तक घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोरोना संकट सुरू झाल्यापासून देशात आणि जगात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही हजारो मुले अनाथ झाली आहेत. दत्तक घेतल्याने अनाथ मुलांना पालकांचे प्रेम मिळते आणि पालकांना मुलांचा आधार मिळतो. यामध्येच अधिकतर असे लोक मुलांना दत्तक घेऊ इच्छितात जे काही कारणास्तव पालक होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येत असे लोक आहेत, ज्यांना अनाथ मुलांना दत्तक घ्यायचे आहे. मात्र भारतात दत्तक घेण्याची प्रक्रिया अत्यंत कठीण मानली जाते.


या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला भारतात मुले दत्तक घेण्याची नेमकी काय प्रक्रिया आहे, याची माहिती सांगणार आहोत. भारतात मूल दत्तक घेण्यासाठी पालकांना अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जावे लागते. चला तर मग जाणून घेऊया भारतातील मुले दत्तक घेण्याच्या प्रक्रियेबद्दल -


हे लोक भारतात मुलांना दत्तक घेऊ शकतात: 



  • भारतात मुले दत्तक घेण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने एक प्राधिकरण तयार केले आहे. त्याचे नाव केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) असे आहे. हे प्राधिकरण केंद्राच्या महिला आणि बाल संगोपन मंत्रालयाच्या देखरेखीखाली काम करते.

  • भारतात मूल दत्तक घेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाने तयार केलेल्या नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  • भारतीय नागरिक अनिवासी भारतीय आणि परदेशी नागरिक भारतात एखादे मूल दत्तक घेऊ शकतात, परंतु केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाने तिघांसाठीही वेगवेगळे नियम केले आहेत.

  • याद्वारे एकल पालक किंवा जोडपे दोघेही मूल दत्तक घेऊ शकतात.

  • जर एखादे जोडपे मूल दत्तक घेत असेल तर त्या जोडप्याच्या लग्नाला 2 वर्षे पूर्ण झाली असावीत.

  • दत्तक घेतलेल्या मुलाच्या आणि पालकांच्या वयात किमान 25 वर्षांचा फरक असावा.

  • तसेच मुलाला दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना आधीपासूनच कोणत्याही प्रकारचा गंभीर आजार नसावा.   

  • मूल दत्तक घेण्यासाठी दोन्ही पालकांची संमती आवश्यक आहे.

  • जर एखाद्या महिलेला मूल दत्तक घ्यायचे असेल, तर ती सहज मुलगा किंवा मुलगी दत्तक घेऊ शकते.

  • तसेच जर एखाद्या पुरुषाला मूल दत्तक घ्यायचे असेल, तर त्याला फक्त मुलगाच दत्तक घेता येऊ शकतो. तसेच कोणतेही जोडपे एक मुलगा किंवा मुलगी दत्तक घेऊ शकतात.

  • मूल दत्तक घेताना पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली असणे आवश्यक आहे.


मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया: 



  • मूल दत्तक घेण्यासाठी सर्वप्रथम पालकांना CARINGS www.cara.nic.in वर स्वतःची नोंदणी करावी लागेल. याशिवाय पालक मान्यताप्राप्त भारतीय प्लेसमेंट एजन्सीमध्ये मुलाला दत्तक घेण्यासाठी अर्ज देखील करू शकतात.

  • लक्षात ठेवा ही नोंदणी प्रक्रिया फक्त भारतात राहणाऱ्या लोकांसाठी आहे.

  • यानंतर तुम्ही कोणतीही एजन्सी निवडू शकता. तुम्हाला जिथून मूल दत्तक घ्याचे आहे तिथली. 

  • यानंतर तुमचा आयडी पासवर्ड तयार होईल.

  • त्यानंतर तुम्हाला 30 दिवसांच्या आत मागितलेली सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील.

  • यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक तयार होईल, जो पालकांना दिला जाईल.

  • त्यानंतर न्यायालयाच्या कागदी प्रक्रियेनंतरच मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.


मूल दत्तक घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: 



  • पालकांचे पासपोर्ट आकाराचे फोटो.

  • दोघांचा जन्म दाखला.

  • पत्ता पुराव्यासाठी मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, आधार कार्ड, टेलिफोन बिल इत्यादी सादर केले जाऊ शकतात.

  • विवाहित जोडप्यासाठी विवाह प्रमाणपत्र.

  • घटस्फोटितांसाठी घटस्फोटाची कागदपत्रे.

  • पालकांचे आरोग्य प्रमाणपत्र.