श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्रोच्या (ISRO) आज पहिल्या सूर्य मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. आदित्य एल1 (Aditya L1) हे यान शनिवार (2 सप्टेंबर) रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा (Sriharikota) सतीश धवन अवकाश केंद्रातून या ग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पीएसएलव्ही (PSLV) रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल1 चे प्रक्षेपण होईल. मिशन आदित्यसाठी 1 सप्टेंबर रोजी दुपारी 12:10 वाजल्यापासून काऊंटडाऊन सुरु करण्यात आल्याचं इस्रोने म्हटलं.  


आदित्य एल1 हे लॅग्रेंज पाईंट 1 वरुन सूर्याचा अभ्यास करेल. सौर मंडळातील विविध क्रियांचा, अवकाशातील हवामानाचा अभ्यात आदित्य एल1 करणार आहे. जवळपास चार महिन्यांचा 15 लाख किलोमीटरचा प्रवास करुन हे यान त्याच्या ठराविक स्थानी पोहोचणार आहे. 


इथे पाहाल मिशन आदित्यचं थेट प्रक्षेपण


आदित्य एल1 च्या लाँचिंगचे थेट प्रक्षेपण हे इस्रोच्या अधिकृत बेवसाईटवर करण्यात येणार आहे. तसेच तुम्ही यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून देखील थेट प्रक्षेपण पाहू शकता. डीडी वाहिनीवर देखील या लाँचिंगचे थेट प्रक्षेपण पाहता यईल. सकाळी 11.20 मिनिटांनी या लाँचिंगचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच तुम्ही एबीपी माझावर देखील हे थेट प्रक्षेपण पाहू शकता. एबीपी माझाच्या फेसबुक आणि यूट्यूब पेजवर देखील थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही या प्रक्षेपणाचे प्रत्येक अपडेट्स तुम्हाला जाणून घेता येतील. 






आदित्य एल1 हे लॅग्रेंज पाईंट 1 वर पाठवण्याची अनेक कारणे आहेत. याठिकाणी सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा समतोल साधला जातो. ज्यामुळे या पॉईंटवरुन या यानाला सूर्याचा अभ्यास करणं सोप होईल. तसेच यामुळे इंधनाची बचत होण्यास देखील मदत होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करणार आहे. 


पाच टप्प्यात पूर्ण होणार सूर्याचा प्रवास


आदित्य एल1 हे पाच टप्प्यात सूर्यापर्यंतचा प्रवास पूर्ण करणार आहे. या प्रवासासाठी जवळपास 125 दिवसांचा कालावधी लागेल. पहिल्या टप्प्यात पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल 1 चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या कक्षेत विस्तारले जाईल. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण प्रभावाच्या बाहेर हे यान तिसऱ्या टप्प्यात काढले जाईल. चौथ्या टप्प्यात हे यान सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु करेल. तर पाचव्या टप्प्यात एल1 पाईंटवर हे यान पोहोचेल. 


हेही वाचा : 


Aditya L-1 Mission : आदित्य एल-1 आज सूर्याकडे झेप घेणार, भारताच्या मोहिमेकडं जगाचं लक्ष