Aditya-L1 Mission Launch : सौर मिशन आदित्य-L1 (Aditya-L1) शनिवारी (2 सप्टेंबर, 2023) यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले.  इस्रोच्या (ISRO) या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे. या मोहिमेत अनेक शास्त्रज्ञांची मेहनत आहे. मात्र, मोहिमेच्या यशासाठी महिला शास्त्रज्ञ निगार शाजी आणि अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांची खूप चर्चा आहे. या दोन्ही महिला शास्त्रज्ञांनी या मोहिमेत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, निगार शाजी या मोहिमेच्या संचालक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वाकांक्षी सौर मोहीम सुरू करण्यात आली. त्यांनी मोहिमेच्या प्रक्षेपण उपक्रमांचे नेतृत्व केले. त्याच वेळी, अन्नपूर्णी सुब्रमण्यम या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सच्या संचालक आहेत. त्यांनी सुनिश्चित केले की सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताची पहिली मोहीम सुरळीतपणे कार्य करेल. जाणून घेऊया इस्रोच्या या महिला वैज्ञानिकांबद्दल.


कोण आहेत निगार शाजी?


आदित्य-एल1 मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणावर निगार शाजी म्हणाले की, 'स्वप्न पूर्ण झालं.' निगार शाजी या तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील आहेत. निगार शाजी म्हणाल्या, "हे सर्व स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. पीएसएलव्हीद्वारे आदित्य एल-1 हे लक्ष्यित कक्षेत यशस्वीपणे पोहोचवता आले याचा मला खूप आनंद आहे. एकदा का आदित्य L-1 कार्य करण्यास सुरुवात करेल, तर हे देश आणि संपूर्ण जगाच्या वैज्ञानिक बंधुत्वासाठी एक संपत्ती असेल."


निगार शाजी ISRO येथे भारतीय रिमोट सेन्सिंग, कम्युनिकेशन्स आणि इंटरप्लॅनेटरी सॅटेलाईट प्रोग्राममध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. तिरुनवेल्ली शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकी केल्यानंतर, त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रांची येथून त्याच प्रवाहात मास्टर्स केले. यानंतर, त्या 1987 मध्ये सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये सामील झाल्या आणि नंतर यूआर राव सॅटेलाईट सेंटरचा भाग झाल्या.


निगार शाजी यांनी इस्रोच्या रिमोट सेन्सिंग कार्यक्रमातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी रिसोर्ससॅट-2ए मध्ये सहयोगी प्रकल्प संचालक म्हणून काम केले. Resourcesat-2A हा राष्ट्रीय संसाधन निरीक्षण आणि व्यवस्थापनासाठी भारतीय रिमोट सेन्सिंग उपग्रह आहे.


कोण आहेत अन्नपूर्णी सुब्रमण्यम?


आदित्य एल-1 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणखी एक महिला शास्त्रज्ञ, म्हणजे अन्नपूर्णी सुब्रमण्यम. त्या केरळच्या पल्लकड जिल्ह्यातील आहेत आणि संगीतकारांच्या कुटुंबातील आहेत. अन्नपूर्णी सुब्रमण्यम या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सच्या संचालक आहेत. ही एक विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत स्वायत्त संस्था आहे. या संस्थेने आदित्य-L1 अंतराळयानावरील प्राथमिक उपकरणे विकसित केली आहेत. 


अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांनी पीएचडी IIA मधून पूर्ण केली आणि त्या स्टार क्लस्टर्स, स्टार स्ट्रक्चर्स, गॅलेक्टिक स्ट्रक्चर्स, मॅगेलेनिक क्लाउड्स आणि तारकीय लोकसंख्या या क्षेत्रातील तज्ञ आहेत. आदित्य एल-1 च्या यशस्वी प्रक्षेपणावर अन्नपूर्णी सुब्रमण्यम म्हणाल्या की, 'आदित्य एल-1 साठी प्राथमिक उपकरणे तयार केली आहेत. 


भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शनिवारी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोट येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सौर मोहीम आदित्य एल-1 प्रक्षेपित केले. इस्रोच्या मते, आदित्य-एल1 ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित सौर वेधशाळा आहे. 125 दिवसांत पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर हे यान लॅग्रॅन्गियन पॉइंट L1 भोवती प्रभामंडल कक्षेत ठेवले जाईल. तेथून सूर्यावर घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांकडून आजचे दर जारी; मुंबई, पुण्यात एक लिटर पेट्रोलची किंमत काय?