ABP Cvoter Survey for UP Election 2022: देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सत्ताधारी भाजप, मुख्य विरोधी पक्ष समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेस व्यतिरिक्त छोट्या पक्षांनीही रॅली आणि कॉन्फरन्सद्वारे जनतेला आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, एबीपी न्यूजसाठी सी व्होटर या सर्वेक्षण एजन्सीने यूपीच्या लोकांचा कल जाणून घेण्याच प्रयत्न केला आहे.


उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकू शकतो हे या सर्वेक्षणात स्पष्ट दिसत आहे. सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतासह सत्तेत परतू शकतो.



एकूण जागा-403
कोणाला किती मते आहेत?
भाजप+ 41.8%
एसपी- 30.2%
बसपा- 15.7%
काँग्रेस - 5.1%
इतर- 7.2%


उत्तर प्रदेशच्या सर्वेक्षणानुसार, जर मतांची टक्केवारी जागांमध्ये बदलली गेली तर भाजपला 259-267 जागा, सपा 109-117, बसपाला 12-16 जागा मिळतील असे वाटते. तीन ते सात जागा काँग्रेसच्या खात्यात येऊ शकतात. तर इतरांना 6 ते 10 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.



कोणाकडे किती जागा आहेत?
भाजप+ 259-267
एसपी- 109-117
बसपा-12-16
काँग्रेस - 3-7
इतर- 6-10


मतदानाच्या बाबतीत कोण पुढे आहे
उत्तर प्रदेश
सर्वेक्षणानुसार, भाजप आघाडीला उत्तर प्रदेशात 42 टक्के मते मिळू शकतात. याशिवाय समाजवादी पार्टी आघाडीला 30 टक्के, बहुजन समाज पार्टीला 16 टक्के, काँग्रेसला 5 टक्के आणि इतरांना 7 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.


पुन्हा योगींनाच पसंती
सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशातील 40 टक्के लोकांना योगी आदित्यनाथ यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री म्हणून 27 टक्के लोक पसंत करतात. बसपा सुप्रीमो मायावतींना 14 टक्के, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना तीन टक्के, आरएलडी नेते जयंत चौधरी यांना दोन टक्के आणि इतरांना 12 टक्के पसंती आहे.


टीप - सर्वेक्षणात, उत्तर प्रदेशातील सर्व 403 विधानसभा जागांवर 44 हजार 436 लोकांशी संवाद साधला आहे.