नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीर आणि त्यांच्या परिवाराला हत्येची धमकी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय फोन नंबरवरुन आलेल्या या धमकीनंतर गौतम गंभीर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करुन एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच गंभीर यांनी त्यांची आणि त्यांच्या परिवाराची सुरक्षा सुनिश्चित करण्याचीदेखील मागणी केली आहे.


गंभीर यांनी दिल्लीतल्या शाहद्रा शहराच्या पोलीस उपायुक्तांना पत्र लिहून या घटनेची तक्रार केली आहे. त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, मला आणि माझ्या परिवारातील सदस्यांना आंतरराष्ट्रीय फोन नंबरवरुन सातत्याने हत्येच्या धमक्या येत आहेत. तुम्ही कृपया या प्रकरणात लक्ष घालून एफआयआर दाखल करुन घ्या. तसेच मला आणि माझ्या परिवाराला सुरक्षा प्रदान करा.


गौतम गंभीर हे पूर्व दिल्ली मतदारसंघाचे खासदार आहेत. ते सातत्याने देशातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्वतःचे मत मांडतात. तसेच ते सध्या त्यांच्या मतदारसंघातील कामांमध्ये व्यस्त आहेत.





गंभीर यांनी पोलीस उपायुक्तांना लिहिलेलं पत्र