Gujarat Election ABP C-Voter Survey: गुजरात विधानसभेच्या (Gujrat Vidhan Sabha) निवडणुकीकडे सध्या देशाचं लक्ष लागून आहे. या निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, आपसह (BJP, AAP, Congress) सर्वच पक्ष निवडणूक प्रचारात जोरदार पद्धतीनं गुंतले आहेत. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबरला निकाल लागणार आहे. भाजप, काँग्रेसशिवाय यावेळी आम आदमी पार्टीही पूर्ण ताकद लावत आहे. या सगळ्यात असदुद्दीन ओवेसी ( Asaduddin Owaisi )यांची एआयएमआयएम पार्टी देखील वेगवेगळे दावे करत आहे. एबीपी न्यूजसाठी (Abp C voter) सी व्होटरनं गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साप्ताहिक सर्वे केला आहे. यामध्ये गुजरातमध्ये ओवेसी फॅक्टर किती मोठा मानला जातो? असा सवाल करण्यात आला होता.

  


सी व्होटरने या सर्वेक्षणात प्रश्न विचारला की ओवेसी हे गुजरातमध्ये मोठे फॅक्टर मानले जातात का? या प्रश्नाची उत्तरं समोर आली आहेत.  सर्वेक्षणात 44 टक्के लोकांनी ओवेसी यांना गुजरातमधील एक मोठा फॅक्टर मानला आहे. तर ओवेसी हे गुजरातमध्ये कमी महत्वाचा फॅक्टर असल्याचे 25 टक्के लोकांचे मत आहे. त्याचवेळी गुजरातमध्ये ओवेसी हा फॅक्टरच नसल्याचे 31 टक्के लोकांचे म्हणणे आहे.


गुजरातमध्ये ओवेसींना मोठा फॅक्टर मानता का?


खूप मोठा- 44%
कमी महत्वाचा - 25%
फॅक्टरच नाही - 31%


गुजरातमध्ये 10 टक्के मुस्लिम लोकसंख्या असून 53 जागांवर मुस्लिमांचा प्रभाव लक्षणीय आहे. मुस्लिमांची मोठी लोकसंख्या आतापर्यंत काँग्रेसला मतदान करत होती, मात्र यावेळी आम आदमी पक्षही त्यावर दावा करत आहे. दरम्यान, असदुद्दीन ओवेसी स्वत:ला मुस्लिमांचा खरा समर्थक म्हणवून घेत आहेत. आपला उमेदवार विजयी झाल्यास कत्तलखान्यांची संख्या वाढवण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.


डिस्क्लेमर- सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे साप्ताहिक सर्वेक्षण केले आहे. यासाठी गुजरातमध्ये 2,666 लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.


ही बातमी देखील वाचा


Gujarat Opinion Poll : गुजरातमध्ये सत्ता कुणाची? भाजपला तीन अंकी जागा तर काँग्रेस, आप पिछाडीवर; सर्वेचा अंदाज