Paddy Procurement :  देशात यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणावर तांदळाचे उत्पादन होणार आहे. त्यामुळं देशात अन्नधान्याचे संकट येणार नाही. सध्या केंद्र सरकारकडून देशातील विविध राज्यात तांदळाची मोठ्या प्रमाणावर खेरदी केली जात आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात सरकारकडून तांदळाची खरेदी करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 6.8 टक्के अधिक तांदळाची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळं यावर्षी देशात धान्याचा कोणत्याही प्रकार तुटवडा भासणार नसल्याचे सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. तसेच तांदूळ महाग होणार नसल्याचेही सरकारनं सांगितलं आहे. 


सध्या केंद्र सरकार विविध राज्यात तांदळाची खरेदी सुरु आहे. या परिस्थितीत खरेदीचे नवे आकडे समोर आले आहेत. हे आकडे देशवासीयांसाठीही आनंददायी आहेत. देशात गतवर्षीपेक्षा जास्त धानाची खरेदी झाली आहे. केंद्र सरकारनेही जनतेला अन्नधान्याची चिंता करण्याची गरज नसल्याचे आश्वासन दिले आहे. केंद्र सरकारकडे असलेला बफर स्टॉक पुरेसा असून, आता कोणताही साठा करू नका असे सरकारकडून सांगण्यात आलं आहे.


तांदूळ खरेदीत 6.8  टक्क्यांची वाढ


भारतीय अन्न महामंडळ (FCI) च्या ताज्या आकडेवारीनुसार, चालू खरीप हंगाम 2022-23 मध्ये  7 नोव्हेंबरपर्यंत 21.45 दशलक्ष टन तांदळाची खरेदी झाली आहे, जी मागील वर्षीच्या तुलनेत  6.8 टक्क्यांनी वाढली आहे. यंदा सरकार साठा करण्यासाठी तांदळाची खरेदी लवकरच करणार आहे. कारण केंद्र सरकारकडे असलेल्या तांदळाचा साठा 19 टक्क्यांनी कमी होता. 


पंजाब, हरियाणा, तामिळनाडूमध्ये तांदळाची खरेदी वाढली


देशातील विविध राज्यांमध्ये तांदळाची खरेदी केली जात आहे. जिल्हा स्तरावरून सर्व डेटा गोळा करून राजधानीला पाठवला जात आहे.  आकडेवारीनुसार, पंजाब, हरियाणा आणि तामिळनाडूमध्ये यावर्षी तांदळाच्या खरेदी वाढवली आहे. उत्तर प्रदेश हे अन्नधान्न्याच्या उत्पादनाचं प्रमुख केंद्र मानले जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत इथं उत्पादन कमी आहे. 


बदलत्या हवामानाचा परिणाम


काही राज्यांमध्ये उत्पादनावर परिणाम होण्यामागे हवामान चक्रात झालेला बदल असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मान्सूनच्या हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस न पडल्यामुळे उत्तर प्रदेशात भातशेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटलं आहे. त्यामुळं उत्पादनात घट झाली आहे. चालू खरीप विपणन हंगामात 77.13 दशलक्ष टन धान खरेदी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मागील हंगामात प्रत्यक्ष खरेदी 75.93 दशलक्ष टन होती. भात हे उन्हाळी आणि हिवाळी पीक आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nandurbar : कोकणसह नंदूरबार जिल्ह्यात भात कापणीला सुरुवात, काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीनं तर कुठे ट्रॅक्टरनं मळणी सुरू