ABP C Voter Survey: उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपुरमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूजने सी व्होटरच्या सर्व्हेच्या माध्यमातून जनतेचा कौल जाणून घेतलाय. भाजप, काँग्रेस, सपा-बसपासह अनेक स्थानिक पक्ष आपलं नशीब अजमावत आहेत. पढील काही दिवसांत निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. मात्र, त्यापूर्वीच नेत्यांच्या सभा आणि ऱॅलीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष आपल्या विजयाचा दावा करत आहे.
कुणाचं सरकार येईल? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? कोण मुख्यमंत्री होणार? सत्ताधारी पक्षाला पुन्हा संधी देणार का? सारखे प्रश्न या सर्व्हेमध्ये विचारण्यात आले. साप्ताहिक सर्व्हेच्या माध्यमातून एबीपीने मतदारांचा कौल जाणून घेतला... पाहा काय म्हणतोय सर्व्हे....
युपीमध्ये कुणाला किती मतं?
भाजप - 40 टक्के
समाजवादी पार्टी - 34 टक्के
बसपा - 13 टक्के
काँग्रेस - 7 टक्के
इतर - 6 टक्के
उत्तर प्रदेशमध्ये 403 जागांवर विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यापैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार ?
भाजपा + 212-224
समाजवादी पार्टी+ 151-163
बसपा - 12-24
काँग्रेस- 2-10
इतर -2-6
उत्तराखंडमध्ये कुणाला किती मतं?
एकूण जागा- 70
भाजप-40%
काँग्रेस- 36%
आप- 13%
इतर - 11%
उत्तराखंडमध्ये कुणाला किती जागा मिळणार?
भाजप- 33-39
काँग्रेस- 29-35
आप- 1-3
इतर - 0-1
पंजाबमध्ये कुणाला किती मतं?
एकूण जागा - 117
काँग्रेस- 34%
आप- 38%
अकाली दल + -20%
भाजप - 3%
इतर - 5%
पंजाबमध्ये कुणाला किती जागा?
काँग्रेस- 39-45
आप- 50-56
अकाली दल +17-23
भाजप-0-3
इतर - 0-1
मणिपुरमध्ये कुणाला किती मतं ?
एकूण जागा - 60
भाजप-38%
काँग्रेस-34%
एनपीएफ-9%
इतर - 19%
मणिपुरमध्ये कुणाला किती जागा?
भाजप-29-33
काँग्रेस-23-27
एनपीएफ- 2-6
इतर -0-2
गोव्यात कुणाला किती मतं?
एकूण जागा - 40
भाजप-30%
काँग्रेस-20%
आप-24%
इतर - 26%
गोव्यात कुणाला किती जागा मिळणार?
भाजप-17-21
काँग्रेस-4-8
आप- 5-9
इतर - 6-10
पुढील वर्षी पाज राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील काही दिवसांत निवडणुकासंदर्भात तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर एबीपी न्यूजने पाज राज्यातील मतरांचा कौल जाणून घेण्यासाठी आठवड्याचा सी वोटर सर्व्हे सुरु केलाय. यामध्ये लोकांचा कौल जाणून घेतला जाईल. या सर्व्हेमध्ये पाच राज्यातील 92 हजार पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला होता. पाच राज्यातील 690 विधानसभा जागेवरील लोकांचा कौल जाणून घेतलाय. हा सर्व्हे 13 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान घेण्यात आला होता. दरम्यान, वर्ष 2022 च्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पाडणार आहेत. या पाच राज्यातील निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live