Gujarat Election Opinion Poll 2022: गुजरात विधानसभेच्या निवडणुका (Gujarat Assembly Election 2022) या वर्षी डिसेंबरमध्ये होणार आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. यावेळी गुजराती मतदारांचे लक्ष वेधून घेण्यात आम आदमी पार्टी (AAP) कोणतीही कसर सोडत नसल्याचं दिसत आहे. दरम्यान, अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने एक सर्वे केला आहे. 


देशभराचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. यावेळच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कोणता? सी-व्होटरच्या सर्वेक्षणात विचारलेल्या या प्रश्नाच्या उत्तरात लोकांनी अनेक समस्या सांगितल्या आहेत. परंतु बहुतांश लोकांनी बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या असल्याचे सांगितले आहे.


लोकांसाठी कोणता मुद्दा महत्वाचा...


जनमत सर्वेक्षणात सहभागी असलेल्या 31 टक्के लोकांनी बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या असल्याचे सांगितले. तर 16 टक्के लोकांनी सांगितले की मूलभूत सुविधा नसणे ही सर्वात मोठी समस्या आहे. 15 टक्के लोकांनी शेतकऱ्यांचा समस्यांचा मुद्दा असल्याचे सांगितले. तर 8 टक्के लोकांनी महागाई हा मुद्दा असल्याचे म्हटले आहे. 70 टक्के लोकांच्या मते भ्रष्टाचार हा सर्वात मोठा मुद्दा आहे.  कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा 3 टक्के लोकांच्या मते आहे. केवळ 3 टक्के लोकांनी राष्ट्रीय मुद्द्यांना स्थानिक मुद्दा असल्याचं म्हटलं आहे. त्याच वेळी 13 टक्के लोकांनी 'इतर' या पर्यायाला सहमती दर्शवली.


सर्वेक्षणात अनेक लोकांची मत घेतली


हिमाचल प्रदेशातही याच वर्षी नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा कोणत्याही दिवशी जाहीर होऊ शकतात. तत्पूर्वी, एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने दोन्ही राज्यांतील सर्व मतदारसंघांमध्ये जनमत चाचणी घेतली होती. सर्वेक्षणात दोन्ही राज्यातील 65 हजार 621 लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सर्वेक्षणातील मार्जिन आणि एरर प्लस मायनस 3 ते अधिक उणे 5 टक्के इतका आहे. 



सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातचून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


ABP C-Voter Opinion Poll : गुजरातमध्ये कुणाचं सरकार? हिमाचलचा कौल कुणाला? पहिला ओपिनियन पोल काय सांगतो


ABP C-Voter Survey : शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण कुणाला मिळायला हवं? सर्वेक्षणात लोकांनी यांना दिली पसंती