Aadhaar Card New Guidelines : आधार कार्ड (Aadhaar Card) हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनलं आहे. सरकारी कामानिमित्त असो, किंवा बॅंकेचे काम किंवा नोकरीच्या ठिकाणी अशा प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची आवश्यकता लागतेच. याच आधार कार्डच्या संदर्भात आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार, प्रत्येक व्यक्तीला दर 10 वर्षांनी आपलं आधार कार्ड अपडेट करावं लागणार असा सल्ला दिला आहे. परंतु, याबाबत सक्ती नाही असेही आधार प्राधिकरणाने स्पष्ट केलं आहे. 


सरकारी कामकाजासाठी प्रामुख्याने आधार कार्डची गरज भासते. तसेच, तुमचा जर मोबाईल नंबर चेंज झाला असेल किंवा तुमचा पत्ता चुकीचा लिहीला गेला असेल, तुमची जन्मतारीख अपडेट करायची असेल या आधी ही माहिती फक्त दोनच वेळा अपडेट करता येत होती. तसेच, यासाठीही अनेक समस्यांना सामोरे जावं लागायचं. मात्र, सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता तुम्ही या चुका दुरुस्त करून दर 10 वर्षांनी आधार कार्ड अपडेट करू शकता. 


आधार पत्ता ऑनलाइन अपडेट करण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा :


 1. https://myaadhaar.uidai.gov.in/ या संकेत स्थळावर तुम्ही स्वत: अपडेट करू शकता. आधार स्वयं-सेवा (Self Service) अपडेट पोर्टलवर जा आणि 'पत्ता अपडेट करण्यासाठी पुढे जा' (proceed to update address) पर्यायावर क्लिक करा.
 2. आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि OTP वापरून लॉग इन करा.
 3. 'proceed to update address ' वर क्लिक करा.
 4. 12-अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि 'ओटीपी पाठवा' वर क्लिक करा.
 5. OTP एंटर करा आणि आधार खात्यात लॉगिन करा.
 6. 'update address via address proof' पर्याय निवडल्यानंतर नवीन पत्ता भरा. 
 7. 'Proof of Address' मध्ये नमूद केलेला निवासी पत्ता भरा.
 8. आता, अॅड्रेस प्रूफ म्हणून सबमिट बटणावर क्लिक करा.
 9. पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि 'सबमिट' बटणावर क्लिक करा.


ऑफलाईन पद्धतीने 'असे' करा अपडेट 


तुम्हाला जर तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आधार सेंटरवर जावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला ठराविक शुल्क भरून आधार अपडेट करावं लागेल. आधार अपडेट करायला जाताना फोटो आईडी घेऊन जावं लागेल. 


महत्वाच्या बातम्या : 


Vande Bharat Train : दक्षिण भारतातल्या पहिल्या 'वंदे भारत एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा, पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण