Russia On Indian Medical Students : युक्रेन ( Ukraine ) आणि रशिया ( Russia ) या दोन देशांमध्ये सुमारे आठ महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. या दोन्ही देशांमधील संघर्ष ( Russia Ukraine War ) थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतावं लागलं. त्यामुळे हजारो भारतीय विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी रशियाने ऑफर दिली आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.


युद्घामुळे मायदेशी परतले आहेत भारतीय विद्यार्थी


दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये जातात. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आलं. युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत असलेले हजारो विद्यार्थी भारतात सुखरुप परतले पण त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला. आता रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ऑफर दिली आहे.


भारतीय विद्यार्थ्यांना रशियाकडून ऑफर


रशियन कॉन्सुल जनरल ओलेग अवदीव चेन्नईमध्ये आले. यावेळी त्यांनी सांगितलं आहे की, युक्रेन सोडणारे भारतीय विद्यार्थी रशियामध्ये त्यांचे शिक्षण सुरू पूर्ण करु शकतात कारण दोन्ही देशांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम सारखाच आहे. तसेच,  भारतीय विद्यार्थ्यांना रशियामधील लोकांची भाषा समजणं देखील सोपं जाईल कारण युक्रेनमधील मोठ्या संख्येने लोक रशियन भाषिक आहेत.


रशियामध्ये पूर्ण करता येणार शिक्षण


ओलेग अवदेव यांनी पुढे सांगितलं की, अनेक लोक शिक्षणासाठी रशियामध्ये जातात. रशियामध्ये अधिकाधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करत आहेत. दरवर्षी अनेक भारतीय विद्यार्थी मेडिकल शिक्षण आणि विविध अभ्यासक्रमासाठी युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये जातात. युद्धामुळे, विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी युक्रेनमध्ये परतू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना रशियामध्ये शिक्षण घेण्याची संधी आहे.


भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये का जातात?


दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी मेडिकल शिक्षणासाठी युक्रेनमध्ये जातात. युक्रेनमध्ये मेडिकल शिक्षण आणि इतर अभ्यासक्रम भारताच्या तुलनेनं स्वस्त आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये जाणं पसंत करतात. भारतात प्रायव्हेट कॉलेजमधून मेडिकल शिक्षण घेण्यासठी सुमारे 80 लाख रुपये खर्च करावे लागतात, त्याऐवजी युक्रेनमध्ये सुमारे 25 लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात.


युद्धामुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम


मिळालेल्या माहितीनुसार, रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यावर 90 फ्लाईट्समधून 22 हजार 500 भारतीयांना युक्रेनमधून सुखरुप भारतात आणण्यात आलं. यामध्ये बहुतेक हे भारतीय विद्यार्थी होते, जे युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत होते. हे विद्यार्थी सुमारे आठ महिन्यांपासून आपल्या शिक्षणासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI