Swati Sachdeva Bisexual stand-up Comedian: "होय, मी बायसेक्शुअल आहे", अशी स्वत:ची ओळख करुन देणाऱ्या स्वाती सचदेवचा स्टॅंड-अप कॉमेडीचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. फेसबुक , इंस्टाग्रामवर देखील अनेकांनी हा व्हिडियो शेअर केला आहे. मात्र स्वाती हे एवढं सहज आणि सोप्या पद्धतीने हसत का सांगते? ती खरंच बायसेक्स्यूअल आहे की फक्त कॉमेडी करते आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचं उत्तर तिच आपल्या व्हिडियोतून सांगते आहे. मात्र स्वाती नक्की आहे तरी कोण?
''तुम लोगो को पता है ना बायसेक्शुअल कौन होता है.... , याच ओवर कॉन्फिडेंसमध्ये मला गर्दीने होकार दिला ...पिछले शो में एक अंकल से पूछो, बताओ बायसेक्शुअल कौन होता है, काका म्हणतात, आप वही हो ना जो साल में दो बार करते है...'' अशीच काही ही स्वाती सचदेव आपली ओळख सांगते, जो व्हिडिओ मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. स्वाती सचदेव एक स्टॅंड अप कॉमेडियन आहे. तिचा स्टॅंड अप व्हिडिओ प्रेम हे प्रेम आहे प्रचंड व्हायरल होतोय.
कोण आहे स्वाती सचदेव?
स्वाती सचदेव ही दिल्लीची एक स्टँड-अप कॉमेडियन आहेत. शिवाय स्वाती सचदेव लेखक, डिजिटल कंटेंट क्रिएटर आहेत. तिने काही दिवसांपुर्वी व्हिडिओ केला होता. त्यात ती LGBTQ बाबत मोकळेपणाने बोलताना दिसली. याच व्हिडिओत तिने स्वत:बाबतचा देखील खुलासा केला. तिचा जन्म 1992 साली पंजाबमध्ये झाला. जाहिरातीच्या क्षेत्रात ती कार्यरत होती. मात्र त्यानंतर तिने पुर्ण वेळ स्टँड-अप कॉमेडी करण्याचा निर्णय घेतला.
पालकांचा पाठिंबा
मी व्हिडिओमार्फत माझ्याबाबत सगळ्यांना सांगते आहे. मात्र माझ्या पालकांना मी आधीच याबाबतची माहिती दिली आहे. त्यांचा मला भक्कम पाठिंबा आहे. त्यामुळे मी या सगळ्या विषयावर मोकळेपणाने बोलू शकते. माझं बायसेक्स्यूअल असणं माझ्या पालकांनी स्वीकारलं आहे. त्याच्यामुळेच मी नोकरी सोडून स्टँड-अप कॉमेडी करण्याचा निर्णय घेतला आहे, असं ती सांगते.